News Flash

हँडसम असण्याचे तोटे, कर्मचाऱ्याचा १०% पगार कापला

विमानतळाच्या धावपट्टीवरील फोटो व्हायरल झाला होता

चीनमधील विमानतळावरच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सुंदर दिसण्याचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. आता या कर्मचाऱ्याचंच घ्या ना. त्याच्या दिसण्यानं त्यानं विमानातील एका प्रवाशाचं लक्ष वेधून घेतलं, मग काय या प्रवाशानं त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. हँडसम दिसत असल्यानं सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा झाली. रातोरात हा हँडसम हंक प्रसिद्ध झाला. पण ही प्रसिद्धी त्याला भोवली परिणामी त्याच्या पगारातून जवळपास १०% रक्कम कंपनीनं दंड म्हणून कापली. त्यामुळे सुंदर दिसण्याचा त्याला जसा फायदा झाला तसाच तोटाही झाला.

त्याचं झालं असं की हा कर्मचारी धावपट्टीवरून चालत येत होता. त्याला पाहून एका महिला प्रवाशानं त्याचा व्हिडिओ काढून व्हिबो या सोशल मीडियावर शेअर केला. अनेकांनी याची तुलना दक्षिण कोरियातल्या एका सुपरस्टारशीही केली. रातोरात प्रसिद्ध झालेल्या हा कर्मचाऱ्याचा व्हिडिओ त्याच्या कंपनीतील वरिष्ठापर्यंत पोहोचला. या व्हिडिओत काही वावगं नसलं तरी एक गोष्ट मात्र कंपनीतील वरिष्ठांना खटकली. ती म्हणजे त्याचे कपडे. कंपनीच्या ड्रेसकोडप्रमाणे त्यानं योग्यरित्या कपडे परिधान केले नव्हते. त्याचप्रमाणे धावपट्टीवर तो ज्या प्रकारे खिशात हात घालून वावरत होता ते कंपनीच्या नियमावलीत बसत नाही त्यामुळे नियमभंग केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करत त्याच्या पगारातली १०% रक्कम कापण्यात आली.

पण या कर्मचाऱ्याला मात्र याचं फारसं वाईट वाटलं नाही. माझ्यावर कारवाई करण्यात आली ती योग्यच होती, कारण मी काही नियम मोडले आहेत त्यामुळे मला वाईट वाटलं नाही असं तो CGTN ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. त्याचा पगार कापण्यात आल्यानंतर अनेकांनी महिला प्रवाशांना दोष दिला. पण तिनं मला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली त्यामुळे तिला दोष देऊ नये असंही हा कर्मचारी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 4:33 pm

Web Title: airport worker loses 10 per cent salary due to casualness
Next Stories
1 VIDEO : बैलाचा महिलेवर हल्ला, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2 तेलुगू देसम पक्षाचे खासदार साडी नेसून पोहोचले संसदेत
3 BLOG – ट्रॉफी जिंकलो कार्तिकमुळे, चर्चा मात्र कोहली, धोनीचीच!
Just Now!
X