News Flash

महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो?? अजिंक्य रहाणेला हवी आहे तुमची मदत

सोशल मीडियावर चाहत्यांना विचारला प्रश्न

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. काही महिन्यांपूर्वी अजिंक्यने आपली लहान मुलगी आणि परिवारासोबत वेळ घालवत सुट्टीचा आनंद घेतला. सुट्टीच्या या कालावधीमध्ये अजिंक्य संगमनेरला आपल्या आजीला भेटायला गेला होता. या ट्रीपचे फोटो अजिंक्यने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

अजिंक्यने आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या चाहत्यांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांबद्दल प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात बरीच सुंदर ठिकाणं आहेत, ज्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल…असं म्हणत अजिंक्यने आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

रहाणे हा मागील अनेक महिन्यांपासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघापासून दूर आहे. पण कसोटी संघाचा मात्र तो नियमित सदस्य आहे. त्यामुळे त्याची फेब्रुवारीमध्ये सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघातील निवड जवळ जवळ पक्की आहे.

अवश्य वाचा – कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 10:47 am

Web Title: ajinkya rahane ask his fans about famous tourist destinations in maharashtra psd 91
Next Stories
1 कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल
2 सुपरओव्हरवर बंदी घाला, भारताच्या विजयानंतर क्रीडामंत्र्यांची अजब मागणी
3 IND vs NZ: चौथ्या सामन्याआधी मोहम्मद शामीने मुलीसाठी लिहिला खास संदेश
Just Now!
X