News Flash

रोहितने विचारलं शॉपिंग की जेवण? अजिंक्य म्हणाला पुढच्यावेळी तुलाही घेऊन जातो

अजिंक्यच्या उत्तरावर नेटकरी फिदा

दिवाळी संपली असली तरीही देशभरात दिवाळीचं उत्साहाचं वातावरण अजुनही कायम आहे. मग या सगळ्या आनंदोत्सवात आपले क्रिकेटपटू तरी कसे मागे राहतील. नुकत्याच एका लहान मुलीचा बाबा झालेल्या अजिंक्य रहाणेने आपली पत्नी राधिकासोबत दिवाळीचं शॉपिंग केलं. आपल्या लहानग्या मुलीसाठीही यंदा अजिंक्यने भरपूर खरेदी केली. शॉपिंगदरम्यानचा एक फोटो अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Diwali shopping with @radhika_dhopavkar! Special shopping this time for the special one at home!

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

रोहितच्या या फोटोवर त्याचा मुंबईकर साथीदार रोहित शर्माने, शॉपिंग करायला गेलायस की जेवण करायला?? मला पाठीमागे बुफे दिसतोय…अशी भन्नाट कमेंट केली.

रोहितच्या या कमेंटला अजिंक्यनेही तितकच भन्नाट उत्तर देत नेटकऱ्यांची मनं जिंकली.

3 नोव्हेंबरपासून भारताच्या बांगलादेश दौऱ्याला सुरुवात होणार असून पहिल्यांदा दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित शर्माकडे भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 4:38 pm

Web Title: ajinkya rahane gives reply to rohit sharma on his instagram post people loves it psd 91
Next Stories
1 तुम्हालासुद्धा ‘रांगोळी’चा स्टँप हवाय का?
2 सहकार्य कर नाहीतर नवऱ्याला संपवेन, शरीरसुखासाठी मित्राकडून विश्वासघात
3 बापरे… एका रात्रीत तो २४ वर्षीय तरुण ट्रम्प यांच्यापेक्षा झाला अधिक श्रीमंत
Just Now!
X