News Flash

किती वेगळी दिसतेय माझी लेक ! अजिंक्यने शेअर केला आर्याचा खास फोटो

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचीही फोटोला पसंती

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेही सध्या आपल्या घरी पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवतो आहे. आर्यासोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ अजिंक्य वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असतो.

गुरुवारी अजिंक्यने आर्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. २ आठवड्यांच्या आर्याला घेतानाचा आणि ८ महिन्यांच्या आर्याला कडेवर घेतानाचा फोटो पोस्ट करत अजिंक्यने, आर्या किती वेगळी दिसायला लागली आहे अशी कॅप्शन टाकली आहे.

सध्या सर्व क्रिकेट सामने बंद असल्यामुळे बहुतांश क्रिकेट बोर्डांना आर्थिक नुकसान होत आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येतं का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. तेराव्या हंगामात अजिंक्य आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:38 pm

Web Title: ajinkya rahane share adorable picture with his daughter aarya on social media psd 91
Next Stories
1 “आम्ही विश्वास ठेवला अन् तुम्ही विश्वासघात केलात”; रोहितने शेअर केला हृदय पिळवटून टाकणारा फोटो
2 असं वाटायचं बाल्कनीत जाऊन जीव द्यावा ! दोन वर्ष नैराश्यासोबत लढत होता ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू
3 आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून पर्यायांवर विचार सुरु
Just Now!
X