News Flash

जेव्हा अजिंक्य आपल्या मुलीला गाण्याचे धडे देतो, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा विश्वालाही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघातले सर्व खेळाडू सध्या घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. एरवी मैदानात असणाऱ्या खेळाडूंसाठी या परिस्थितीशी जुळवून घेणं सुरुवातीच्या क्षणांमध्ये फारसं सोपं नव्हतं. मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेही आपल्या पत्नी आणि मुलीसोबत घरात राहून वेळ घालवतो आहे.

अजिंक्य लॉकडाउन काळात आपल्या मुलीसोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असतो. नुकताच अजिंक्यने आपल्या मुलीला गाण्याचे धडे देतानाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात अजिंक्य आपल्या मुलीला एखाद्या गायकाप्रमाणे ताना शिकवताना दिसतोय, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाबांचं हे अनोखं रुप पाहिल्यानंतर आर्यानेही त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय. पाहा हा व्हिडीओ…

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आहे. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात तो सहभागी झाला होता, मात्र मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला आपलं स्थान कायम राखता आलेलं नाहीये. आयपीएलमध्ये अजिंक्य यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा हंगाम स्थगित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:37 pm

Web Title: ajinkya rahane shares adorable video with his daughter on social media psd 91
Next Stories
1 लॉकडाउनमधील हौस! ‘हे’ पदार्थ सर्वाधिक सर्च करत लोकांनी पुरवले जिभेचे चोचले
2 किंमत १० हजारांपेक्षाही कमी, Realme Narzo 10A ची काय आहे खासियत? 
3 ‘आत्मनिर्भर म्हणजे काय रे भाऊ?’, भारतीयांना पडला प्रश्न; गुगल सर्चचे आकडे पाहून व्हाल थक्क
Just Now!
X