News Flash

Video: मुकेश अंबानींच्या मुलाच्या व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेचे सत्य

पत्रिका दीड लाखांची असल्याचं म्हटलं जात होतं

हा व्हिडिओ खोटा असून फक्त सोशल मीडियावर खळबळ माजावी यासाठी कोणीतरी तो तयार केला असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याची लग्नपत्रिका वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही अलिशान लग्नपत्रिका पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. या लग्नपत्रिकेची किंमत जवळपास दीड लाख असल्यानं लोकांची उत्सुकता आणि कुतूहल जास्तच वाढलं. त्याचप्रमाणे पत्रिकेवर सोन्याचं नाजूक नक्षीकाम केल्याचंही म्हटलं जातं होतं. या पत्रिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिलायन्स उद्योगसमूहाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या पत्रिकेचा व्हिडिओ आकाश अंबानींचा नसल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अॅपवर व्हायरल होणारा लग्नपत्रिकेचा व्हिडिओ हा आकाश अंबानीचा नाही. हा व्हिडिओ खोटा असून फक्त सोशल मीडियावर खळबळ माजावी, यासाठी कोणीतरी तो तयार केला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला विराट- अनुष्काच्या लग्नाच्या चर्चेनंतर आकाश अंबानीही चर्चेत आला होता. आकाशच्या लग्नपत्रिकेची किंमतच दीड लाख असल्याचं ऐकून अनेकजण चक्रावून गेले होते. पण, आता ही पत्रिका आकाशची नसल्याचं समजल्यानं सोशल मीडियावरची त्याची लग्नाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 11:51 am

Web Title: akash ambanis viral wedding card is just a hoax
Next Stories
1 जाणून घ्या २०१७मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले?
2 Video : अन् भावूक झालेल्या चाहत्यानं मैदानातच धोनीच्या पायांना केला स्पर्श
3 २०१७ मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द माहितीये का?
Just Now!
X