News Flash

Viral Video : तारेच्या कुंपणावर चढणारी मगर बघून लोक झाले अवाक्

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

पावसाचे पाणी वाढले की, मगर दिसल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरायला लागतात. काही मगरी पुराच्या पाण्यात वाहून नागरी वस्त्यांत शिरतात तर काही जलसाठ्यात येऊन पोहोचतात. पण, तारेचं कुंपण पार करून जाणारी मगर बघून लोक अवाक् होत आहे. होय, तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

तारेचे कुंपण चढून जाणाऱ्या मगरीचा व्हिडीओ आहे फ्लोरिडातील. जॅकसनव्हीले हवाई दलाच्या तळाजवळ ही मगर आढळून आली. क्रिस्टिना स्टीवर्ट यांनी कुंपण चढून जात असताना मगरीचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला आहे.

हवाई तळाजवळ मगर असल्याचे कुणीतरी बोलले. तिथे जाऊन ती मगर बघितल्यावर मला खुप आनंद झाला. सरपट जाऊन ती मगर कुंपण चढून पलिकडे अदृश्य झाली, असे क्रिस्टिना स्टीवर्ट यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर लोकांनी प्रचंड कौतूक केले आहे. ३,७०० लोकांनी त्यांची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर लोकांच्या भन्नाट प्रतिक्रियाही येत आहेत. मी प्राणीप्राणी आहे. पण मगर कुंपण चढून जाताना पहिल्यांदाच बघितले आहे, असे एका युजर्सने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 4:18 pm

Web Title: alligator climbing over a fence people in shock bmh 90
Next Stories
1 पाकिस्तानी मंत्र्याचा खोटारडेपणा उघड, काश्मीरच्या नावाने शेअर केला भलताच व्हिडिओ
2 …म्हणून ते आजही कचोरी २५ पैशांना तर भजी प्लेट एक रुपयाला विकतात
3 VIDEO: विंडो सीटवरुन पोलिसांमध्येच झाली हणामारी, सीटही गेली अन् नोकरीही
Just Now!
X