तुम्ही मुंबईच्या लोक  ट्रेनने प्रवास केला असेल तर ट्रेनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विकायल्या येणाऱ्या विक्रेत्यांना तुम्ही नक्कीच पाहिलं आणि एेकलं असेल.

“ए पाँच रिबिया, पाॅच रिबियाSS”

“ए छीकी छीकी”(चिक्की नाही)

अशा प्रकारचे विचित्र आवाज काढत हे सगळे विक्रेते दणादण एका गाडीतून दुसऱ्या गाडीत उड्या टाकत आपला माल खपवत असतात. त्यांच्या या आरोळ्या विचिजत्र असल्या तरी गिऱ्हाईकांना त्या व्यवस्थित कळतात. याचं आपल्याकडचं उदाहरण म्हणज लग्नाच्या पंगतीतला वाढपी

“ताक्ताक्ताताक” किंवा “भात्भात्भात्भात” म्हणत पंगतीच्या एका टोकापासून मॅरेथाॅन धावत जाणारा हा माणूस तोंडातल्या तोंडात बडबडत असतो.

थोडक्यात काय तर आपल्या कामावर हात बसलेली ही सगळी मंडळी ते काम इतक्या सहजीपणे करतात की विचारूच नका. आता आपल्यापैकी अनेकांना काँप्युटरवर टाईप करताना मध्ये मध्ये का होईना कीबोर्ड कडे पाहावंच लागतं. पण हेच एखाद्या काँप्युटर प्रोग्रँमरकडे बघा. कीबोर्डकडे न बघता चाललेल्या त्याच्या या खडखड खडखडीकडे पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं पण त्याची एकही चूत होत नाही.

बँकेचे कॅशिअरही तसेच. आपण त्यांच्याकडे दिलेल्या नोटांची गड्डी ते ज्या सफाईने दणादण मोजतात ते पाहून भारी कौतुक वाटतं (आधीच आपल्या पैशांकडे पाहताना आपण बायकोकडे पाहणार नाही इतक्या प्रेमळ नजरेने पाहत असतो). तर अशाच काही आपल्या कामावर तुफान हात बसलेल्या कर्माचाऱ्यांचा हा व्हिडिओ

 

वारकऱ्यांची भजनामध्ये ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते तसं हे सगळे आपापल्या कामात तल्लीन झालेले असतात. एवढं की आपण काम करतोय याचंही त्यांना भान नसावं. पण आपापल्या कामात तरबेज झालेल्या या सगळ्याची ते काम करत असताना एकही चूक होत नाही हे विशेष