अ‍ॅडॉल्फ हिटलरला जगातील सर्वात क्रूर हुकूमशाह असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत असलेल्या या हुकूमशाहाचा मृत्यू १९४५ साली झाला. मात्र आजही त्याचे आकर्षण जगभरातील लोकांमध्ये पहायला मिळते. तीन वर्षांपूर्वी हिटरचे ‘माईन काम्फ’ हे हिटलरचे आत्मचरित्र जगातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक होते. मात्र या पुस्तकाची विक्री अॅमेझऑन वेबसाईटने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

का केलं हिटलरचं आत्मचरित्र बॅन?

‘माईन काम्फ’ हा पुस्तकाची मागणी वर्षाला हजारोंमध्ये असतानाही अॅमेझॉनने विक्री बंद केली आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘माईन काम्फ’ हे पुस्तक त्यांच्या नियमांचं उल्लंघनं करत. संपूर्ण जग लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करत असताना हिटलरचं आत्मचरित्र मात्र हुकूमशाही प्रवृत्तीचा प्रसार करतं. त्यामुळे अॅमेझॉनने या पुस्तकाची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिटलरचे आकर्षण की कुतूहल?

हिटलरच्या ‘माईन काम्फ’ची विक्री का वाढत गेली? त्याच्याबद्दलचे आकर्षण की त्याचे विचार जाणून घेण्याविषयीचे कुतूहल? या संदर्भात ग्रंथविक्रेत्यांना ठोस सांगता येत नाही. परंतु एककल्ली वृत्तीचा आक्रमक आणि विशिष्ट समुदायाला जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हिटलरचे विचार जाणून घेण्याची जिज्ञासा अलिकडच्या काळातच बळावल्याचे निरीक्षण विक्रेते नोंदवतात.