सर्वाधिक ब्रॅँड मूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या जागतिक सूचीत ‘गुगल’वर मात करत Amazonने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. Amazonनंतर या सूचीत अनुक्रमे Apple आणि Google या कंपन्या आहेत.

जागतिक बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘कॅन्टर’ या संस्थेने आघाडीच्या 100 कंपन्यांची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यानुसार , अॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 315 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अॅमेझॉनने गुगलला मागे सारत पहिल्या स्थानी झेप घेतली. तर गुगलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून अॅपल दुसऱ्या स्थानी कायम आहे. अॅपल व गुगलचे ब्रॅँड मूल्य अनुक्रमे 309.5 आणि 309 अब्ज अमेरिकी डॉलर नोंदवले गेले. या यादीत चौथ्या स्थानी मायक्रोसॉफ्टचा क्रमांक लागलाय.

डेटा लीक आणि डेटा प्रायव्हसी अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतरही ई-कॉमर्स कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंटरनेटवरील विश्वसनीय ब्रँडच्या यादीत सहभागी होण्यात यशस्वी ठरल्या आहेत. रिसर्च कंपनी टीआरए (ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायजरी) ने जारी केलेल्या एका अहवालानुसार ‘अॅमेझॉन’ इंटरनेटवरील सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड आहे. या यादीमध्ये गुगल दुसऱ्या क्रमांकावर आणि फेसबुक तिसऱ्या क्रमांकावर आहे.