जगातील श्रीमंताकडे तुम्ही यापूर्वी वेगवेगळ्या ब्रीडचे श्वान असल्याचं पाहिलं असेल. या श्वानांच्या खाण्या पिण्याचा, देखभालीच्या खर्चाचे आकडे ऐकले तर एखाद्या सामान्य माणसाला घेरी आल्यावाचून राहणार नाही हे नक्की. पण, सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या श्वानाची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे.

बेझोस यांनी नुकताच आपल्या ट्विटरवर रोबो डॉगचा फोटो शेअर केला आहे. बेझोस यांच्या रोबो डॉगला यापूर्वीही आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वी या रोबो डॉगचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एखाद्या आक्रमक पण तितक्याच आज्ञाधारी श्वानाप्रमाणे वावरणाऱ्या या रोबो डॉगनं अनेकांना चक्रावून सोडलं होतं. हेच भविष्य असेल या ओळीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा श्वान जेफ यांचा असून त्यांनी ट्विटवर याचा फोटो शेअर केला आहे. या रोबो डॉगचं नाव स्पॉट मिनी असून जेफ यांनी  स्पॉटमिनीला मार्स २०१८ च्या परिषदेला नेण्याचं ठरवलं आहे.