सध्या सणासुदीचे दिवस सुरु असल्याने अनेक वेबसाईटवर ऑफर्सची रेलचेल सुरु आहे. यामध्ये अनेक बड्या वेबसाईट्स थेट स्पर्धेत उतरल्या असल्याने त्याचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसतो. म्हणूनच मागील काही वर्षांपासून ऑनलाइन शॉपिंगचा वाढता ट्रेण्ड या वर्षीही पहायला मिळतो. अनेकांनी ऑफर्स असल्याने बरीच खरेदी यंदा ऑनलाइन केल्याचे दिसत आहे. मात्र एकीकडे ऑफर्सचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे नेटवर चर्चा आहे अॅमेझॉन या वेबसाईटवरील एका स्लिपर्सची. कारण या स्पीपर्सची किंमत आहे ४५ हजार ३९३ रुपये.

हो तुम्ही वर वाचलेली ओळ खरी आहे अॅमेझॉन भारतामध्ये चक्क ४५ हजारांची स्लीपर विकत आहे. विश्वास बसत नसेल तर हा पाहा स्क्रीनशॉर्ट.

तर व्हॅलेंटिनोज मेन्स हवायीन्स फ्लिप फ्लॉप नावाने वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या या स्पीपर पाहून नेटकरी भलतेच गोंधळात पडलेत. विशेष म्हणजे केवळ एक जोड बाकी असल्याने त्वरा करा असंही वेबसाईटचं म्हणणं आहे.

अवघ्या काही शे रुपयांच्या स्लीपर सारख्या दिसणाऱ्या या स्लीपरच्या किंमतीवरून कंपनीला ग्राहकांनी कमेन्ट सेक्शनमध्ये चांगलेच ट्रोल केले आहे. गुलाबी आणि काळ्या रंगाच्या या स्लीपर घेणे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे पासून ते या चप्पलमध्ये ऑटोपायलेट मोड असल्यापर्यंतच्या अनेक कमेन्ट ग्राहकांनी केल्या आहेत. ग्राहकांनी दिलेल्या भन्नाट कमेन्टसलाही नेटकऱ्यांनी चांगलेच व्हायरल केले आहे. पाहूयात अशाच काही कमेन्ट्स

चप्पलमध्ये ऑटो पायलेट मोड आहे, स्लीपरच्या सुरक्षेसाठी दोन बॉडीगार्ड नेमलेत

मी बाईक विकून या स्लीपर घेतल्या

लॉकरमध्ये ठेवतो या स्लीपर

मी मारुती ८०० विकून घेतल्या या स्लीपर

बरं या महागड्या स्लीपर घ्यायच्या झाल्या तर पैसे जमवण्याची गरज नाहीय. तुम्ही या स्लीपर चक्क इमआयवरही घेऊ शकता. कंपनीने स्लीपर घेण्यासाठी इएमआयचा पर्यायही उपलब्ध करुन दिलाय हे विशेष.