सात लाख चौरस फूटांचं मोठं गोदाम, या गोदामात १२०० जण काम करतात. एवढ्या मोठ्या गोदामापासून शौचालयापर्यंत जायचं म्हणजे किमान चारशे मीटर चालावं लागणार. यात दहा मिनिटं वाया जाणार. जर लघुशंकेसाठी प्रत्येक खेपेला दहा मिनिटे वाया घालवली तर वरिष्ठांचा ओरडा खावा लागणारच पण याचसोबत नोकरीही गमवावी लागणार या भीतीनं अॅमेझॉनच्या गोदामात काम करणारे शेकडो कर्मचारी  रिकम्या बाटल्यातच लघुशंका करतात अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

वाचा : अखेर विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांना ‘मार्केटिंग गुरू’ सापडला

या गोदामात पूर्वी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं ‘द सन’ला ही माहिती दिली आहे. या वृत्तपत्रातील एका शोधकर्त्यांनं गोळा केलेल्या माहितीनुसार इंग्लडमध्ये चार मजल्याचं हे गोदाम आहे. तळमजल्यावर दोन शौचालय आहेत. तळमजल्यावर काम करणाऱ्यांना शौचालय जवळ आहेत पण चौथ्या मजल्यावर काम करणाऱ्यांना मात्र बरंच अंतर कापून खाली यावं लागतं. यात किमान प्रत्येक कर्मचाऱ्याची दहा मिनिटे वाया जातात. कर्मचाऱ्यांना प्रत्येक मिनिटांचा हिशोब द्यावा लागतो. त्यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी इथले असंख्य कर्मचारी रिकाम्या बाटल्यांतच लघुशंका करतात अशी माहिती जेम्स ब्लडवर्थ या हेरानं गोळा केली आहे.

वाचा : एका व्हिडिओमुळे ४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले ते घरी परतले!

पण अॅमेझॉननं मात्र ‘बिझनेझ इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत जेम्स ब्लडवर्थनं केलेले आरोप फेटाळले आहेत. इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवसांपासून आम्ही सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला पगार दिला आहे. त्यामुळे जेम्स यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचं आहेत असं अॅमेझॉननं म्हटलं आहे.