झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील बडकागाव येथील काँग्रेसच्या महिला आमदार अम्बा प्रसाद सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहेत. अम्बा प्रसाद यांनी रस्त्यांच्या कामाची पहाणी करताना जेसीबी चालवल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. एकीकडे अम्बा प्रसाद यांनी रस्त्याचं काम नीट होत आहे की नाही यासंदर्भातील चौकशी करण्यासाठी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलेलं असतानाच दुसरीकडे काहींनी अम्बा प्रसाद यांनी जेसीबी चालवण्याचं शिक्षण कुठे घेतलं असा प्रश्न विचारत आहे. कमर्शियल व्हेइकल आणि अवजड वाहने चालवण्याचा परवाना नसताना त्यांना जेसीबी कसा चालवू दिला?, असा प्रश्न काहीजण विचारत आहे.

नक्की पाहा >> लस At First Sight… ‘या’ फोटोवरुन नेटकऱ्यांमध्येच जुंपली; जाणून घ्या नक्की घडलंय काय?

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

अम्बा यांनी बडकागाव येथील एका रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम करण्यासाठी स्वत:च्या खासगी खर्चामधून खडी आणि इतर साहित्य मागवल्याचं न्यू १८ ने म्हटलं आहे. या कामासाठी जेसीबी मागवण्यात आला आला होता. पहाणीसाठी आलेल्या अम्बा यांनी स्वत: जेसीबीमध्ये बसून तो चालवून पाहिला.

नक्की पाहा >> Viral Video : पाहता पाहता ६५ वर्षीय आजोबा प्रवाहासोबत वाहून गेले; तरुण मात्र मदतीऐवजी Video काढण्यात Busy

या पहाणीदरम्यान अम्बा प्रसाद यांनी स्थानिकांना स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती करण्यासाठी हातात फावडं घेऊन स्वत: गटारांमध्ये साचलेला गाळ आणि कचरा काढला. आपल्या गावातील, घरातील साफसफाई करताना लाज वाटण्यासारखं काहीच कारण नाही असा संदेश या कृतीमधून देण्याचा प्रयत्न अम्बा यांनी केला.

नक्की पाहा >> Viral Video : …अन् अवघ्या काही क्षणांमध्ये दरीत पडला १८० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

अम्बा यांनी बडकागावमधील टॅक्सी स्टॅण्डपासून मुख्य रस्त्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीसाठी पैसे दिले आहेत. या रस्त्यावर तीन तीन फुटांचे खड्डे असल्याची स्थानिकांची तक्रार होती. पावसाळ्यामध्ये येथे पाणी साचून स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने तातडीने हे काम सुरु करण्यात आलंय.