News Flash

साडी नेसून ‘ती’ अमेरिकी महिला करतेय ट्रम्पना विरोध

साडीच नेसण्यामागे तिची एक भूमिका आहे

(छाया सौजन्य : stajo12/ Instagram)

नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला, यावर खूश होऊन एकीकडे ट्रम्प यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय तर ट्रम्प विरोधकांनी मात्र निदर्शने करत त्यांना आपला विरोध कायम असेल, अशी भूमिका घेतली आहे. कोणी ट्रम्पविरोधी घोषणा असलेल्या पाट्या हातात घेऊन निषेध व्यक्त केला. तर कोणी जाहीर भाषणं देऊन विरोध दर्शवला. पण एक अमेरिकन महिला अशी आहे, जिने ट्रम्पना विरोध करण्यासाठी वेगळे हत्यार शोधून काढले आहे. ते हत्यार म्हणजे ‘साडी’. हे ऐकून तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं असेल ना? साडी आणि विरोध याचा काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण फक्त साडी नेसूनच ‘ती’ का विरोध करत आहे याचेही एक कारण आहे आणि हे कारण ऐकलं तर तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल.

ट्रम्पची मुस्लिमविरोधी भूमिका, जगातील इतर लोकांना तुच्छ लेखण्याची मानसिकता, निर्वासितांबद्दल त्यांच्या मनात असणारा द्वेष सर्वज्ञात आहे. ट्रम्प यांची ही भूमिका तिला पटत नाही. अमेरिका महान आहे, पण या देशाला महान बनवण्यासाठी सगळ्यांनीच मोलाचे योगदान दिले आहे. तेव्हा एखाद्या समाजाबद्दल, धर्माबद्दल द्वेष मनात ठेवून काय उपयोग आहे? अमेरिकेची संस्कृती सगळ्यांना समावून घेणारी आहे पण ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अमेरिकन विभागले आहेत. ते मुस्लिम, आशियायी वंशांतील लोकांचा द्वेष करू लागले आहेत असं तिचे मत आहे. म्हणूनच अशा मानसिकतेविरुद्ध स्टेसी जेकॉब या अमेरिकन महिलेने साडी नेसून अनोख्या पद्धतीने लढा देण्याचे तिने ठरवले.

विविध धर्माचे लोक एकोप्याने नांदत असलेला भारत तिला खूपच आवडला. भारतीय महिलांच्या साडी या पेहरावाच्या तर ती प्रेमातच पडली, तिचे साडीवर एवढे प्रेम जडले की पाश्चात्त्य कपड्यात वावरणारी स्टेसी सर्रास साडी नेसूनच वावरू लागली. आणि याच साडीला तिने ट्रम्पच्या मुस्लिम आणि आशियायीविरुद्धच्या भूमिकेचे हत्यार बनवले. ‘एका अमेरिकन महिलेला साडीत वावरताना पाहून लोक विचारतात, तेव्हा साडी नेसण्याची माझी  भूमिका मी लोकांना सांगते.’ असंही ती म्हणाली. तिचे विचार काहींना पटतात तर काहींना पटत नाही. आज अनेक भारतीयांवर हल्ले होत आहे. त्यांना इथे सुरक्षित वाटत नाही,  पण मी त्यांच्यासारखा पेहराव करून त्यांच्यासोबत वावरते.  त्यांच्या पाठीशी माझ्यासारखे अनेक अमेरिकन आहेत हेच मला माझ्या कृतीतून सांगायचे आहे म्हणूनच मी  साडीला  ट्रम्पविरोधी हत्यार बनवले असे ती अभिमानाने सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 10:11 am

Web Title: american woman stacy jacobs protest donald trump by wearing saree
Next Stories
1 वयाच्या १४६ वर्षी जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
2 VIRAL VIDEO : पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे माकड झाले ‘लठ्ठ’
3 Viral Video : बीकॉमपर्यंत शिक्षण आणि व्यवसाय ‘कचरा वेचक’
Just Now!
X