‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी युट्यूबबर गौरव वासनयाने गैरफायदा घेत मिळालेली मदत म्हणून मिळालेली रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आठ महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासणीत वासन आणि त्याच्या पत्नीच्या बॅंक खात्यात साडेचार लाख रुपये जमा झाले होते आणि ते पैसे तक्रार दाखल केल्यानंतर कांता प्रसाद यांच्या खात्यात टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही दिवसात वासन याच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आरोपावरून ८१ वर्षीय प्रसाद यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांता प्रसाद यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. ते व्हेंटिलेटरवर असल्याचे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. “कांता प्रसाद गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

काळ बदलला… बाबा का ढाबाचे कांता प्रसाद पुन्हा ग्राहकांच्या प्रतिक्षेत

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी, युट्यूबर गौरव वासन याने प्रसाद आणि त्यांची पत्नी यांच्या दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमधील भोजनालयात ग्राहक नसल्याबद्दल बोलत असलेला एक व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांना मदत केली. पण काही दिवसांनी प्रसाद यांनी वासन विरुद्ध मालवीय नगर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्याने आपल्याला मिळालेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

नोव्हेंबरमध्ये प्रसाद यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’सोबत बोलताना सांगितले की, वासन कडून फक्त दोन लाखांचा धनादेश मिळाला होता आणि लोक फक्त सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओसाठी धाब्यावर आले आणि त्यामुळे जेवणाची विक्री झाली नाही.

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात दाखल

पोलिसांनी याबाबत तपास सुरु केल्यानंतर वासनने कांता प्रसाद यांना देणगीरुपाने पैसे मिळावे यासाठी स्वतःच्या बॅंक खात्यासोबत पत्नीच्या खात्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्याचे आढळले.“वासनला साडेचार लाख रुपये मिळाले, पण प्रसाद यांनी तक्रार  दाखल केल्यानंतर त्याने पैसे परत केले. पोलिसांनी आधीपासून वासनची चौकशी केली होती आणि त्याचा जबाब नोंदवला होता, ” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘बाबा का ढाबा’चे मालक पुन्हा व्हायरल, म्हणाले…“चोर नव्हता फूड ब्लॉगर”

काही दिवसांपूर्वी कांता प्रसाद यांनी वासनकडे माफी मागितली  होती त्यावर “सर्व काही ठीक आहे हे चांगले आहे” असे गौरव वासन म्हणला होता. मात्र कांता प्रसाद यांनी आपली तक्रार मागे घेण्यास नकार दिला आणि तपास अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली.