30 November 2020

News Flash

“करोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन विषाणू…”; अमृता फडणवीसांचा टोला

पुन्हा एकदा शिवसेनेवर साधला निशाणा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. पावरलेस मुख्यमंत्री असं समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. यामुळे समितला अटक केली का? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला. आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘पेंग्विन महा सरकार विषाणू’ म्हणत शिवसेनेवर निशाना साधला आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्विट –
करोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही, कुठे, कसे ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा.. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!

नेमकं काय प्रकरण –
समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज (२४ ऑक्टोबर) अटक केली आहे. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 1:08 pm

Web Title: amruta fadanvis tweet shivsena troll sammet thakkar nck 90
Next Stories
1 महिलेने ‘मॅक-डी’मधून मागवला बर्गर, मिळालं फक्त केचअप; कारण वाचून व्हाल हैराण
2 कहर…! दसऱ्याआधीच रावण अ‍ॅम्ब्युलन्सवर झाला आडवा
3 ‘लगता है आप को बिहारवाला भैक्सीन घोंपना पड़ेगा..’; मित्राचा संदर्भ देत ट्रम्प यांना ओपन लेटर
Just Now!
X