17 January 2021

News Flash

कागदावरील ‘त्या’ तीन शब्दांमुळे अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

अमृता यांनी ट्विटरवर पोस्ट केलेले फोटो चर्चेत

(Photo: Twitter/fadnavis_amruta)

राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस हे सध्या वेगवेगळ्या शहरांमधील करोना परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी दौरे करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून फडणवीस हे चर्चेत आहेत. सरकारला करोनासंदर्भातील यंत्रणा उभारण्यात आलेले अपयशासंदर्भात केलेले भाष्य असो किंवा प्रत्यक्ष करोना केंद्रांना भेटी देणं असो फडणवीस हे सध्या सतत बातम्यांमध्ये दिसत आहेत. मात्र आता बुधवारपासून त्यांची पत्नी म्हणजेच अमृता फडणवीस या त्यांनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे अचानक चर्चेत आल्या आहेत. अमृता यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्या ट्रोल होत आहेत.

अमृता यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. यामध्ये नागपूरमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याचे काही फोटो अमृता यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केले. या फोटोंमध्ये अमृता या कंप्युटर स्क्रीनसमोर बसून वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत.


मात्र त्यांच्या या चार फोटोंपैकी एका फोटोमध्ये उजव्या बाजूला कोपऱ्यात दिसणाऱ्या कागदावरील तीन शब्दांमुळे त्या सध्या ट्रोल होत आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमधील एका फोटोतील कागदावर ‘फोटो लेते रहो’ असे तीन शब्द लिहिल्याचे दिसत आहे. काही जणांनी हा फोटो क्रॉप करुन कागदाच्या तेवढ्याच तुकड्याचा फोटो अमृता यांच्या या फोटोवर कमेंटमधून पोस्ट केला आहे.

तर काही जणांनी या फोटोवर कमेंट करताना पुढच्या वेळेस सुचना दिल्यानंतर कागद उलटा करुन ठेवा असा सल्ला अमृता यांना दिला आहे.

तर काहींनी फोटोच्या स्पेलिंगवरुन अमृता यांना ट्रोल केलं आहे.

या फोटोवर ४०० हून अधिक कमेंट्स असून अनेकांनी याच तीन शब्दांवरुन प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:07 pm

Web Title: amruta fadnavis troll over her instruction of taking photos during webinar scsg 91
Next Stories
1 छोरा गंगा किनारेवाला… PPE कीट घालून विकतो पान; बनारसमधील पानवाला ठरतोय चर्चेचा विषय
2 ‘कार’नामा : पोलिसांना गुंगारा दिलेल्या कारचोराचा अपघात; समोरची महिलाही निघाली कारचोर
3 Video: याला म्हणतात Work From Wedding! स्वत:च्याच लग्नात स्टेजवर लॅपटॉप घेऊन बसली नववधू
Just Now!
X