करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर भारतात चीनविरोधी जनभावना निर्माण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमूलने आपली क्रि‍एट‍िव्हिटी दाखवत भन्नाट कार्टून काढले होते. अमूलने तीन जून रोजी चीनविरोधात एक कार्टून प्रकाशित केलं होतं. त्यामुळे ट्विटरने त्यांचं अधिकृत खातं ब्लॉक केलं. अमूलचं खातं बंद केल्यानंतर ट्विटरवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने युटर्न घेत रुटीन सेफ्टी प्रोटोकॉलमुळे अमूलचं खातं ब्लॉक केल्याचं म्हटले.

मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर #AmulVsChina असा हॅशटॅग ट्रेंड होतोय, नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अमूलचं ट्विटर खातं पुन्हा एकदा सुरू झालं आहे. पण चीनच्या संबंधित एक कार्टून ट्वीट केल्यानंतर अमूलचे खातं Restricted झाल्याचा मेसेज आला होता. ट्विटरचे असे म्हणणे आहे की, सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिले असता त्यांची ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. तर ट्वीटरने अमूल कंपनीचे अकाउंट ब्लॉक केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तीन जून रोजी अमूल कंपनीने क्रिएटिव्ह कॅम्पेन Exit The Dragon असे केले होते. त्यामध्ये चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यासंबंधित एक कार्टून पोस्ट करण्यात आलं होतं. त्याखाली About the boycott of Chinese products…असे कॅप्शनही लिहण्यात आलं होतं. अमूलच्या कार्टूनमध्ये लाल आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये आइकॉनिक अमूल गर्लला एका ड्रॅगनविरोधात लढताना दाखवण्यात आलं आहे. याच कार्टूनमध्ये बॅकग्राहउंडला चिनी व्हिडियो-शेअरिंग मोबाइल अॅप टिकटॉकचा लोगो  दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय मोठ्या अक्षरात अमूल ‘Made In India’ ब्रँड असं लिहलेलं आहे.

Image

amun and twitter

amul and twitter