एखाद्या सरकारी प्रकल्पांमध्ये आपली जमीन, घरं, शेती गमावणाऱ्या अनेक कुटुंबांबदद्ल तुम्ही ऐकलं असेल. सरकारी प्रकल्प हे लोकांच्या कल्याणासाठी असतात. या प्रकल्पांच्या मार्गात येणाऱ्या जमिनी अधिग्रहीत केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना मोबदला आणि दुसरीकडे जमीनं देण्याची तजवीज सरकार करतं. या प्रकल्पांना अनेकदा विरोधही होतो. मात्र, सरकारी यंत्रणा आणि रेट्यामुळे या विरोधकांना बहुतेकदा माघार घ्यावी लागते. पण चीनमधल्या एका वृद्ध दाम्पत्यांनं केलेला विरोध इतका प्रभावी होता की, या वृद्ध दाम्पत्याच्या हट्टापुढे सरकारने नमते घेतले. अखेर प्रकल्पाच्या अभियंत्यांनी जगात कुठेही अस्तित्त्वात नसेल असा अजब रस्ता बांधला.

VIRAL: फळ विक्रेत्यांकडून अशाप्रकारे होतेय ग्राहकांची फसवणूक

लुओ बाओगेन आणि त्यांची पत्नी वेनलिंग शहरात आपल्या पाच मजल्यांच्या इमारतीत राहत होते. पण त्याच परिसरातून महामार्ग जाणार होता म्हणून सरकारने या भागात भूसंपादन करायला सुरूवात केली. पण लुओ बाओगेन आणि त्यांच्या पत्नीने याला तीव्र विरोध केला. सरकार अत्यंत कमी मोबदला देत असल्याचे लुओ बाओगेन यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी याविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांचे शेजारीपाजारी आपापल्या जमिनी सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र, लुओ बाओगेन आणि त्यांच्या पत्नीने शेवटपर्यंत आपले घर सोडले नाही.

विसरभोळेपणाचा कहर ; २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली त्याच ठिकाणी

शेवटी त्यांच्या हट्टापुढे हात टेकत सरकारनं त्यांच्या इमारतीच्या बाजूनं महामार्गाचं बांधकाम केलं. बांधकामाच्या प्रचलित नियमांकडे पाहता या रस्त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. या महामार्गाच्यामध्ये बाओगेन यांची पाच मजली इमारत जशीच्या तशी उभी आहे. या इमारतीमुळे लोकांना बाओगेनच्या इमारतीला वळसा घालूनच मग जावं लागतं. बाओगेनला आता इथली लोकं ‘किंग ऑफ द रोड’ म्हणूनच ओळखू लागली आहेत.