News Flash

फॅशन डिझायनिंगमधले करिअर सोडून ‘ती’ दाखल झाली पोलीस दलात

महिला पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत

( छाया सौजन्य : ह्युमन्स ऑफ अहमदाबाद )

चांदीच्या ताटात जेवणा-या श्रीमंताची मुले काय करत असतील हो! पैसा, मज्जा मस्ती, दिमतीला नोकर चाकर सारे काही असते. बोट ठेवू ते द्यायला आई वडिल तयार असतात. अशी श्रीमंतांची मुलं एक तर मोठे होऊन वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतात, परदेशात जातात किंवा असे करिअर निवडतात जिथे अगदी गलेलोठ्ठ पगार मिळेल. तुमच्याही अशा मुलांविषयी या समजूती असतील तर तुम्ही महिला सहआयुक्त मंजिता वंझाराविषयी वाचलं पाहिजे. एका सधन कुटुंबात तिचा जन्म झाला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, पुढे आवड म्हणून फॅशन डिझाइनिंगचा कोर्सही केला. एका चांगल्या ब्रँडमध्ये कामही केले. पण हे सारे काही करण्यासाठी आपण जन्माला आलो नाही ही खंत कुठेतरी शांत बसून देत नव्हती. समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने तिला असे झपाटून टाकले की तिने पोलिसांची नोकरी स्विकारली.

वाचा : फेसबुक पोस्ट वाचून टांझानियात अडकलेल्या मुलीची स्वराज यांनी घेतली दखल

मुळची गुजरातची असलेली मंजिता वंझारा ही सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. एका सधन कुटुंबात तिचा जन्म झाला. घरची श्रींमती होती पण वडिलांनी मात्र तिला यापासून शक्य तेवढे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. माणूस जेव्हा धडपड करतो तेव्हा त्याला खरं आयुष्य कळतं. श्रीमंतीत जगणा-या माणसाला सामान्यांच्या समस्या नाही समजायाच्या, तिचे वडिल नेहमी सांगायचे. म्हणूनच एका सामान्य मुलीसारखे आयुष्य मंजिता जगली. यावेळी तिला अनेक चांगले वाईट अनुभव आले. समाजाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन बदलला. आपणही समाजाचे देणे लागतो हे तिला कळलं. म्हणूच आपले इंजिनिअर आणि फॅशन डिझायनिंगचे करिअर मागे टाकत तिने पोलिस दलात प्रवेश केला. तीची ही गोष्ट ह्युमन्स ऑफ अहमदाबादमध्ये सांगण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त मंजिता सध्या एका एनजीओबरोबर मिळून समजातील विविध समस्यांवर काम करत आहे.

वाचा : अजगर पकडण्यासाठी खास भारतातून बोलावले गारूडी, ४६ लाख पगार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 7:11 pm

Web Title: an engineer and a fashion designer woman manjita vanzara chose a police job
Next Stories
1 फेसबुक पोस्ट वाचून टांझानियात अडकलेल्या मुलीची स्वराज यांनी घेतली दखल
2 viral video : महिलेने क्षुल्लक कारणासाठी गर्भवती महिलेची वाट रोखून धरली
3 इथे १५ मिनिटात भाग्य बदलून मिळेल!
Just Now!
X