News Flash

या वर्षांत ब्रिटनमध्ये जन्मलेले पहिले मूल हे भारतीय वंशाचे

१२.०१ मिनिटांनी तिचा जन्म झाला

( छाया सौजन्य : Sandwell and West Birmingham Hospitals )

एलिना कुमारी या चिमुकलीला जगात येऊन फक्त तीन दिवस झाले आहे. तरीही तिच्या जन्माची जगभरात चर्चा आहे. आणि याचे कारण आहे ते एलिनाची जन्मतारिख. तिचा जन्म बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी झाला. म्हणूनच २०१७ मध्ये जन्मलेली ती ब्रिटनची पहिली मुलगी ठरली आहे.

VIRAL VIDEO : सापाने चक्क अजगराला गिळले

एलिना कुमारी ही भारतीय वंशाची आहे. तिच्या जन्मवेळेमुळे तिच्या नावाची चर्चा अधिक आहे. कारण २०१७ मध्ये जन्मलेली ती पहिली व्यक्ती आहे. तिची जन्मतारिख १ जानेवारी असली तरी तिची जन्मवेळ रात्री १२ वाजून १ मिनिटे अशी आहे. या वेळेमुळेच तिच्या जन्माची चर्चा आहे. बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात तिचा जन्म झाला. भारती कुमारी असे एलिनाच्या आईचे नाव आहे. एलिनाला दोन वर्षांचा छोटा भाऊ देखील आहे. एलिनाची प्रकृतीही उत्तम आहे. भारती यांची प्रसूतीची तारिख ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होती. त्यातून ३१ डिसेंबरला त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आणि बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी एलिनाचा जन्म झाला. पण त्याचबरोबर या वर्षांत जन्मलेली एलिना ही ब्रिटनमधली पहिली व्यक्ती ठरली. तिच्या जन्मवेळेमुळे जगभर तिची चर्चा आहे.

Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 7:05 pm

Web Title: an indian origin baby girl ellina kumari was first baby of 2017
Next Stories
1 जगप्रसिद्ध नेपच्युनच्या नग्न पुतळ्याला फेसबुकने ठरवले आक्षेपार्ह
2 VIRAL VIDEO : सापाने चक्क अजगराला गिळले
3 लॉटरी जिंका आणि कोंबडी, मासे, बदक मिळवा!
Just Now!
X