तुम्ही कधी एकटेच एखाद्या मस्त ठिकाणी फिरायला गेले आहात आणि तिथे तुम्हाला आजूबाजूला केवळ कपलच कपल भेटलेत असं झालं आहे का? काही लोकांबरोबर अनेकदा असं होतं. अनेकदा तर अशा जोडप्यांच्या आजूबाजूला भटकतानाही एकटेपण वाटतं. असंच काहीसं झालं आग्नेय युरोपमधील कोसोवो या देशातील एका तरुणीबरोबर. पण हाच एकटेपणा घालवण्यासाठी आणि आपल्या सोलो ट्रीपचे भन्नाट फोटो क्लिक करण्यासाठी या तरुणीने एक भन्नाट कल्पना लढवली आणि आज जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

कोसोवो या लहानश्या देशात राहणाऱ्या क्रिस्तीयाना कुक्वी ही पहिल्यांदा २०१६ साली पॅरिसमध्ये भटकंतीसाठी गेली होती. जोडप्यांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या या शहरामध्ये अनेक जोडपी तिला भटकताना दिसले. अनेकजण एकमेकांचे फोटो काढत होते. भटकंती करताना हल्ली अनेकजण चांगले चांगले फोटो काढण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशीच धडपत तेथील जोडपी करत असल्याचे क्रिस्तीयानाच्या लक्षात आले. त्यावेळी तिला आपलाही भन्नाट फोटो असावा असं वाटलं आणि तिने आयफेल टॉवरसमोर चक्क एका अनोळखी व्यक्तीचे चुंबन घेत फोटो क्लिक केला. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला हा अनोळखी पुरुषांचे चुंबन घेऊन फोटो काढण्याचा ट्रेण्ड पुढेही क्रिस्तीयानाने सुरुच ठेवला. भन्नाट ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथे असा एखादा छान फोटो काढण्याबरोबर असं वागण्याने मला एकटं भटकण्यासाठी आत्मविश्वास मिळतो असं क्रिस्तीयाना सांगते.

क्रिस्तीयाना आज इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय सेलिब्रिटी असून तिच्या इन्स्ताग्राम पोस्ट पाहिल्यास वेगवेगळ्या ठिकाणी तिने वेगवेगळ्या पुरुषांचे चुंबन घेत फोटो काढल्याचे दिसून येते. इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या क्रिस्तीयानाने ट्विटवर पॅरिसरमधील जुना फोटो ट्विट केल्यानंतर ती चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

When in Rome 

A post shared by Kristiana Kuqi (@kristianakuqi) on

‘अशाप्रकारे अनोळखी पुरुषांबरोबर चुंबन घेतानाचे फोटो काढल्याने मला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो जो संपूर्ण ट्रीपभर माझ्याबरोबर राहतो. मी असं काही करते यावर सुरुवातील माझा विश्वास बसला नाही. मात्र नंतर दुसऱ्या प्रदेशामध्ये असं साचेबद्ध न वागता वेगळं काहीतरी करण्याच्या इच्छेने असेल किंवा इतर काही पण मी अनोळखी पुरुषाचे चुंबन घेण्याची हिंमत करते हे माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारं असतं’, असं क्रिस्तीयानाने ‘इन्सायडर’ या वेबसाईटशी बोलताना सांगितले.