News Flash

आनंद महिंद्रांनी ‘या’ खास व्यक्तीबरोबर केले नवीन वर्षाचे स्वागत; म्हणाले…

"तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत कसे केले?, असा प्रश्न कोणीतरी मला विचारला"

आनंद महिंद्रा

२०१९ हे वर्ष संपलं आणि जगभरामध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आलं अनेकांनी ३१ डिसेंबरला आपल्या मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर सेलिब्रेशन केलं असेल. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनीही एका खास व्यक्तीबरोबर नवीन वर्षाचे स्वागत केले. महिंद्रा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आनंद महिंद्रा हे ट्विटरवर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. कधी ते ट्विटवरुन गरजूंना मदत करतात तर कधी दैनंदिन घडामोडींवर ते ट्विटरवरुन भाष्य करताना दिसतात. वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला काय केलं याबद्दलचं ट्विट केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.

काय म्हणाले महिंद्रा?

आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एका लहान बाळाने आनंद महिंद्रांचे बोट पकडल्याचे दिसत आहे. या फोटोबद्दल सांगताना महिंद्रा ट्विटमध्ये म्हणतात, “कोणीतरी मला, तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत कसे केले असा प्रश्न विचारला. तर मी नवीन वर्ष काही आवाज करत किंवा फटाके फोडत साजरे केले नाही. मी आणि माझ्या पत्नीने आमच्या नातवाला संभाळत होतो. माझी मुलगी तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी गेल्याने आम्ही नातवंडाबरोबर घरीच थांबलेलो. यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आणि आनंदात मी कधीच नवीन वर्षाचे स्वागत केल्याचे मला आठवत नाही. मला वाटतं आपण वयाबरोबर परिपक्व होत जातो.”

आनंद महिंद्रा यांना दिव्या आणि आलिका अशा दोन मुली आहेत. या दोघींबद्दल एका कार्यक्रमामध्ये बोलताना महिंद्रा यांनी, “महिंद्रा अॅण्ड महिंद्रा हा काही कौंटुंबिक उद्योग नसून माझ्या मुली त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करु शकतात,” असं स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 12:30 pm

Web Title: anand mahindra celebrated new year eve with grandson scsg 91
Next Stories
1 मोबाइलवर Porn पाहण्यात भारताचा क्रमांक वाचून हैराण व्हाल, अमेरिका-जपानलाही टाकलं मागे
2 अदनानने शेअर केला पँट-शर्ट घातलेल्या हत्तीचा फोटो, म्हणाला…’माझे जुने कपडे’
3 Fact Check: आसाममधील डिटेंशन सेंटरमध्ये मुस्लिमांना मारहाण?; जाणून घ्या सत्य
Just Now!
X