News Flash

हृदयस्पर्शी! ‘तो’ व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रांच्या डोळ्यात पाणी

तुम्ही पाहिलात का त्यांनी ट्विट केलेला व्हिडीओ

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे कायम आपल्या नवनव्या ट्विट्समुळे चर्चेत असतात. विनोदी ट्विटपासून ते जगातील आश्चर्यकारक गोष्टींपर्यंत विविध पद्धतीचे ट्विट ते कायम करत असतात. आनंद महिंद्रा यांनी नुकतेच एक भावनिक ट्विट केले. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहताना त्यांचे डोळे पाणावले असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नाताळचा सण जवळ आला आहे. हा सण देशभरात साजरा केला जातो. पाश्चात्त्य देशांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याच सणाविषयीचा हा व्हिडीओ आहे.

नाताळ सणासंदर्भातील हा व्हिडीओ फारसा मोठा नाही. अवघ्या अडीच मिनिटांत आजोबा आणि नात यांच्यातील एक गोड नातं व्हिडीओमधून उलगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच भावनिक करेल. आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओबाबत अगदी भावनिक होऊन लिहिले आहे की हे चित्रीकरण तर अप्रतिम आहेच. पण हा व्हिडीओ पाहून माझे डोळे पाणावले. मला नात नाही पण माझा नातू याच वयाचा आहे (त्यामुळे मी या आजोबांच्या भावना समजू शकतो.)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यामुळे चांगलाच व्हायरल होत आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर रिट्विटदेखील करण्यात आला आहे. या व्हिडीओचे अनेकांनी कौतुकही केले आहे. ‘किती गोड कल्पना आहे’, ‘व्हिडीओ हृदयाला भिडणारा आहे’, ‘वय कितीही असलं तरी आपण थांबायचं नाही हा संदेश खूप छान दिला आहे’, अशा काही सकारात्मक कमेंट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 8:11 am

Web Title: anand mahindra crying after watching heartwarming emotional video see tweet vjb 91
Next Stories
1 Google वर नाही झाला सायबर अटॅक, कंपनीने दिलं स्पष्टीकरण; सांगितलं सेवा ठप्प होण्याचं नेमकं कारण
2 Video : रेस्तराँचं छप्पर फाडून आठ फुटांचा अजगर बाहेर आला अन्…
3 आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘जगातील सर्वात वेगवान’ मुलाचा व्हिडिओ, वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Just Now!
X