News Flash

… तर कोणत्याही मसाजची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मिश्किल ट्विट

महिंद्रा यांच्या ट्विटला अनेकांनी रिट्विटदेखील केले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हातही दिला आहे. त्यातच आपल्या सेंस ऑफ ह्युमरसाठीही ते परिचित आहेत. नुकतेच त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या त्या ट्विटला अनेकांना रिट्विटही केले आहे. आनंद महिंद्रा यांनी रोड रोलरवर लावलेल्या मसाजच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे.

महिंद्रा यांनी फोटो शेअर केला असून याने मसाज करणाऱ्यांना पुन्हा कोणत्याही मसाजची गरज पडणार नाही. ज्याने रोड रोलवर हे पोस्टर चिकटवले आहे तो एकतर समजदार आहे, नाहीतर लो आय क्यू वा आहे, असे मिश्किल कमेंट महिंद्रा यांनी केले आहे. महिंद्रा यांच्या ट्विटला अनेकांनी रिट्विटदेखील केले आहे. एकाने रिट्विट करत पोस्टर चिकटवणारी व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक असल्याचे सांगत ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी ते चिकटवण्याच्या आपल्या मालकाच्या आदेशाचे पालन केल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने रिट्विट करत याला बॉडी मसाज नाही तर बॉडी खल्लास म्हणा असे म्हटले आहे.

अनेकदा आनंद महिंद्रा ट्विटवरून चर्चेत आले होते. यापूर्वीही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘एकीकडे आम्ही स्वयंचलित कार आणि गाड्यांवर लक्ष केंद्रीत करत असताना मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मी या स्वयंचलित छत्रीसाठी अधिक उत्साहित आहे,’ असे त्यांनी लिहिले होते. तसेच त्यापूर्वी मोदींच्या विजयानंतर लंडनमधील गरब्याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्याला गरबा शिकण्याची इच्छा असल्याचेही म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 10:52 am

Web Title: anand mahindra funny tweet about body massage road roller poster
Next Stories
1 मैत्रीचं ऋण! त्याच्या मृत्यूनंतर मित्रांनी फेडलं १४ लाखांचं कर्ज
2 कॅन्सर नसताना दिली केमोथेरपी; महिलेची झाली वाताहत
3 या पाच कारणांमुळे महिला टाळतात ‘ब्रेकअप’
Just Now!
X