आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’मधून नेहमीच फॉलोअर्सला वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीचे आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एक नवीन संदेश ट्विट केला आहे. हा संदेश प्रत्येक पालकांसाठी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आजही एखाद्या कलेला हवं तसं स्थान आपल्याकडे मिळतं नाही. कला असून काही उपयोग नाही कलेमुळे तुझं पोट थोडीच भरणार आहे त्यापेक्षा नोकरी कर दरमहिन्याला ठराविक रक्कम हाती येईल असं अनेक पालक म्हणतात. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं आपल्या छंदाकडे, कलेकडे पाठ फिरवतात. त्यामुळे पालकांनी हा संदेश आवर्जून वाचावा असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एका भिंतीवर दोन प्रकारे हा संदेश लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही कशाप्रकारे वाचून आत्मसात करता यावर सारं काही अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनं आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करताना या संदेशाच्या दोन्ही बाजू पाहून त्याचा योग्य अर्थ आत्मसात करावा असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.