महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटवर खूप अॅक्टीव्ह आहेत. दैनंदिन घटनांबद्दल आणि वेगवेगळ्या घडामोडींबद्दल ते ट्विटवरून व्यक्त होताना दिसतात. महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आला आहे.

आनंद महिंद्रा हे ट्विटवर सतत वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करत असतात. मग ते अगदी व्हॉट्स अॅपवर आलेले फोटो असो किंवा फिरण्यांच्या ठिकाणांची माहिती विचारणे असो आनंद महिंद्रा ट्विटवरुन आपल्या फॉलोअर्सशी सतत संपर्कात असतात. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आणि पाहता पाहता तो फोटो व्हायरल झाला.

आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एका भाजीविक्रेत्याच्या पाटीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने तिरंगा साकरालेला दिसत आहे. पाटीच्या एका काडीमध्ये वर गाजर, मध्यभागी मुळा आणि तळाला भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे या फोटोत दिसते. हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”

आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून तयार केलेला तिरंगा दाखवला आहे. सामान्य लोक देशाबद्दलचे प्रेम कशाप्रकारे दर्शवतात हे दाखवणारे अनेक फोटो त्यांच्या फॉलोअर्सने रिप्लायमध्ये ट्विट केले आहेत.

१)
सलाम

२)
समान्यांची देशभक्ती

३)
देशभक्तीचा धागा

४)
भाज्यांचाच असाही तिरंगा

५)
कोल्ड ड्रिंक्सचा तिरंगा

या ट्विटशिवाय आनंद महिद्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणानंतरही ट्विट केले होते. भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केला होता.