News Flash

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल – आनंद महिंद्रा

लॉकडाउन वाढवण्याच्या मुद्दावर व्यक्त केली चिंता.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवण्याच्या मुद्दावर पुन्हा एकदा आपली चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. पण प्रशासनासमोर असलेले पर्याय सुद्धा तितके सोपे नाहीत हे सुद्धा त्यांनी मान्य केले.

त्यांनी आपल्या टि्वटमध्ये एका लेखाचा सुद्धा दाखला दिला आहे. ज्या लेखात कोविड-१९ ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढवणार नाही तर त्यामुळे दुसरे गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकते’ असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

“लॉकडाउन आणखी बऱ्याच काळासाठी वाढवला तर आर्थिक हाराकिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते” असे आनंद महिंद्रा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते. “लॉकडाउनमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील पण लॉकडाउन वाढला तर मात्र समाजातील कमकुवत घटकांच्या अडचणींमध्ये वाढ होईल” असे त्यांनी लिहिले होते.

देशात सध्या चौथा लॉकडाउन सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसची साखळी तोडता आलेली नाही. देशात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढतेय. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 6:44 pm

Web Title: anand mahindra says lockdown extensions could be economically disastrous dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Viral Video: जंगलातील थरार कॅमेऱ्यात कैद; चित्ता वेगाने पाठलाग करताना वापरतो ‘ही’ शक्कल
2 Viral video: कावळ्याची कमाल! अडकलेल्या प्राण्याला रस्ता ओलांडण्यास केली मदत
3 Video: ट्रेन स्थानकात थांबली अन् बिस्कीट, वेफर्ससाठी उडाली मजुरांची झुंबड
Just Now!
X