सोशल नेटवर्कींगवर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या भारतीयांपैकी एक नाव म्हणजे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा. फोटोंना कॅप्शन देण्याचे आवाहन करण्यापासून ते क्रिकेटच्या समान्यांबद्दल आणि व्हॉट्सअपवरील मेसेजपासून ते मदतची घोषणा करण्यापर्यंत अनेक गोष्टी आनंद महिंद्रा ट्विटरवरुन करतात. अनेकदा त्यांनी मांडलेल्या मतांवरुन सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगताना दिसते. असेच एक ट्विट नुकतेच त्यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या घराजवळच्या परिसरात येणाऱ्या बासरी विक्रेत्याची कथा सांगितली आहे.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी सध्याच्या करोनाच्या काळात बासरीवाल्याकडून खरंच लोकं बासरी विकत घेतील का असा प्रश्न मला पडतो असं म्हटलं आहे. “दर रविवारी एक बासरी विक्रेता माझ्या घराजवळून जातो. तो एका बसरीवर चित्रपटातील गाणी वाजवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची बसरी ऐकून मला एकदम उत्साहवर्धक वाटते. मात्र सध्या मला एक प्रश्न पडतो की या कालावधीमध्ये कोणी त्याच्याकडून बासरी घेईल का?, इन्फेक्शनच्या भीतीने कोणी बारसी घेईल का असा विचार माझ हृदय पिळवटून टाकतो,” असं आनंद महिंद्रा यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

sharda madeshwar upsc marathi news, sharda madeshwar upsc marathi news
चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

या बासरीवाल्याला मदत करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी काय केलं हे पुढच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. “त्या बसरी विक्रेत्याला मदत व्हावी म्हणून मी दर रविवारी एक बासरी विकत घ्यायचो आणि ती नष्ट करायचो. माझ्या स्वत:च्या मनाला शांती मिळावी म्हणून मी हे करायचो. मात्र करोनामुळे त्या बसरीवाल्याचं सर्व आर्थिक गणित कोलमडलं असून ते लवकर सावरण्याची शक्यता नाही हे दिसून येतं. आपल्या देशात वेगवेगळ्या समाजामध्ये या बासरीवाल्यासारखे लाखो लोकं असतील,” असं महिंद्रा म्हणतात.

“या बासरीवाल्याप्रमाणे अनेक जण जगण्यासाठी धडपडत असतील. हे लोक उपजिविकेसाठी संवाद आणि सामाजिक सहकार्य असणाऱ्या सामाजावर अवलंबून असतात. आपण मोठ्या उद्योगांबद्दल बोलताना सावरण्यासाठी मोठ्या मागणीची गरज आहे असं म्हणतो. मात्र हा बसरीवादक या वाढत्या मागणीचा विचार करु शकतो का? तो यातून सावरु शकतो का? त्यांची आर्थिक गणितं आणि त्यांच्या संघर्षाला पाठिंबा देताना आपली कर्तव्य नक्की काय आहेत?,” असा प्रश्न महिंद्रा यांनी पुढील ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.

या सिरीजमधील शेवटच्या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी अशा लोकांसाठी काय करता येईल याबद्दल विचारणा केली आहे. “मग चांगला उद्योग म्हणजे काय? चांगले उत्पादन म्हणजे काय?, चांगली सेवा म्हणजे का? चांगले व्यवस्थापन… की इतर काही?, उद्योग व्यवसायांची समाजातील नक्की भूमिका काय, त्यांची सामाजाप्रती असणारी कर्तव्ये काय आहेत हा चर्चेसाठी दशकातील सर्वात महत्वाचा विषय आहे. याबद्दल आपल्याला चर्चा करण्याची, संवाद साधण्याची गरज आहे. तर तुमच्या मते, चांगला उद्योग म्हणजे नक्की काय?,” असा प्रश्न महिंद्रा यांनी उपस्थित केला आहे.

आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय दिले असून त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी अनेकांनी महिंद्रांसारखा मोठा माणूस एवढ्या लहान स्तरावरील व्यक्तीचा विचार करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं आहे.