News Flash

Video : आनंद महिद्रांनी ट्विट केलेला ‘चायनिज गरबा’ डान्स पाहाच!

अवघ्या दोन तासांत हा व्हिडियो जवळपास १६ हजार लोकांनी पाहिला आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीचे आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’ मधून काही भन्नाट व्हिडिओ किंवा कल्पना इतरांसोबत शेअर करतात. ट्विटरवर ते सर्वाधिक सक्रिय असतात. कधी कोणाच्या कामाची दखल घेत तर कधी कोणाला प्रेरणादायी ठरेल असे काहीतरी शेअर करत ते आपण जागरुक असल्याचे दाखवून देतात. कधी याच माध्यमातून ते मदतीचा हात पुढे करतात तर कधी मनोरंजन करणारा एखादा व्हिडियो पोस्ट करतात. नुकताच त्यांनी असाच एक व्हिडियो शेअर केला असून तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर काही प्रमाणात हास्य उमटू शकेल. काही दिवसांवर नवरात्र आले असून महिंद्रा यांनी एक व्हिडियो ट्विट केला आहे. हा व्हिडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होत आहे.

Next Stories
1 #ShaheedBhagatSingh : शहीद- ए- आझम भगतसिंग यांच्याविषयी या गोष्टी माहित आहेत का?
2 Video : शाळेत पोहोचण्यासाठी अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यातून चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास
3 प्रिंटसाठी पैसे नसल्याने तरुणाने हातानेच लिहीला नोकरीचा अर्ज
Just Now!
X