सध्या सणासुदीचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी सेल सुरु असून वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यावर जाहिरातींचा मारा करण्यात येत आहे. यातही मुख्यपणे ऑनलाइन वेबसाईट्सवर नवरात्रीच्या निमित्ताने विशेष ऑफर्स असल्याने वृत्तपत्रांमधील जाहिरातींमधून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या वेबसाईट्स करत आहेत. मात्र या अती जाहिरातबाजीला वाचक कंटाळले असल्याचे चित्र सोशल मिडियावरून वारंवार व्यक्त होताना दिसत आहे. या जाहिरातबाजीला वैतागलेल्यांमध्ये आता महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी ट्विट करून या अती जाहिरातबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

महिंद्रा हे ट्विटवर खूप अॅक्टीव्ह आहेत. दैनंदिन घटनांबद्दल आणि वेगवेगळ्या घडामोडींबद्दल ते ट्विटवरून व्यक्त होताना दिसतात. असेच त्यांनी आज सकाळी केलेले एक ट्विट भलतेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका वृत्तपत्राचा फोटो पोस्ट केला असून खूप साऱ्या जाहिरातींबद्दल नाराजी व्यक्त करताना हा पेपर आहे की मॉल असा सवालच उपस्थित केला आहे असं म्हणता येईल.

या ट्विटमध्ये महिंद्रा म्हणतात, ‘वृत्तपत्राचे बातम्या असणारे पहिले पान वाचण्यासाठी आधी जाहिरातींची दहा पाने चाळावी लागली. माझ्या मते याचा अर्थ उपभोग हीच सर्वात मोठी बातमी आहे. जर वृत्तपत्रांनी पहिलं पान महत्वाच्या बातम्यांचेच ठेऊन पुढील पानांवर हा जाहिरातींचा मॉल भरवल्यास अधिक चांगले होणार नाही का?’

महिंद्रांच्या या ट्विटवर अवघ्या काही तासांमध्ये दीड हजारहून अधिक रिट्विटस तर सहा हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या ट्विटवर सहाशेहून अधिक जणांनी आपले मत नोंदवले असून अनेकांनी महिंद्रांच्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगितले आहे.

नीलाभ म्हणतात, ‘खबरो के लिफाफे में बाजार आया है’

अजून दहा वर्षांनंतर

वृत्तपत्र उद्योगाचे मरण जवळ आले आहे

सेल आहे तर ते सेल करणारच

आजच्या जमान्यात पैसे अधिक महत्वाचे

आता महिंद्रांच्या या ट्विटवर जोरदार चर्चा सुरु असून वृत्तपत्रांनी खरच याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे.