मुलाला पाठीला बांधून न्यूज बुलेटीन दिल्यामुळे युनायटेड स्टेटसमधील एका न्यूज अँकरचे मागच्या काही दिवसांपासून विशेष कौतुक होताना दिसत आहे. Minnesota या चॅनेलच्या अँकरची बातम्या वाचायची स्टाईल लोकांना विशेष आवडली आहे. याचे कारण म्हणजे अँकरींग करताना या महिलेने आपल्या पाठीवर २१ महिन्यांच्या मुलाला बांधले आहे. आता अशाप्रकारे तिने मुलाला पाठीला बांधून अँकरींग का केले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर बाळाला बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाचे प्रमोशन करण्यासाठी या अंकरने ही गोष्ट केली आहे. महिला अँकर सुशी मार्टिन ही हवामानाच्या बुलेटीनचे अँकरींग करत असताना मुलाला पाठीला बांधलेल्या अवस्थेत दाखल झाली.

आपल्या या उपक्रमाबाबत सांगताना मार्टीन म्हणते, International Babywearing Week सुरु असल्याच्या निमित्ताने मी हे केले आहे. बुलेटीनची सुरुवात करताना ती आपण कापडाने मुलाला बांधले असल्याचे सांगते आणि मग हवामानाचे एपडेटस द्यायला सुरुवात करते. यामध्ये ती बर्फवृष्टीचे प्रमाण, तापमान आणि एकूण हवामान याबाबत माहिती देते. मार्टीनचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशाप्रकारे बाळाला बांधून अँकरींगचे काम करताना मी इतर महिलांना प्रेरणा देऊ शकले तर माझ्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब ठरले. मी मुलाला जन्म दिल्यापासून या बांधण्याच्या कापडाचा वापर करत आहे. आता ही गोष्ट माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाल्याचेही ती म्हणते. जेव्हापासून मी हे वापरते तेव्हापासून मी आणि माझ्या मुलाच्या नात्यातील तो एक महत्त्वाचा हिस्सा झाला आहे.

कामाच्या वेळीही मी याच्यामुळे मी माझ्या मुलाला जवळ ठेऊ शकते आणि त्यामुळे मला एक चांगली माता झाल्याची अनुभूती येते. मार्टीन सांगते, माझी कंपनी मला केवळ कर्मचारी म्हणूनच नाही तर एक आई म्हणूनही अतिशय चांगली वागणूक देते. आमच्या राष्ट्रीय हवामानाच्या बुलेटीनमध्ये मार्टीनने एका खास पाहुण्याला घेऊन अँकरींग केल्याने ते विशेष झाले आहे. मात्र आमचे दुर्दैव हे आहे की हा पाहुणा नेमका यावेळी झोपला आहे. तो झोपला असल्याने आम्ही खेद व्यक्त करत आहोत असेही कंपनीने यामध्ये म्हटले आहे.