News Flash

Video : स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने वाचवले मांजरीच्या पिलाचे प्राण!

बाईक राईडरच्या रुपाने मांजरीच्या पिलाचा जीव वाचला असल्याने माणुसकी जिवंत असल्याचे घडले दर्शन.

मांजरीच्या पिलाचे प्राण वाचविताना केव्हीन (सौजन्य - केव्हीन, फेसबुक)

बाईकवरुन वेगाने जात असताना बऱ्याच जणांचे भान हरपलेले असते. त्यांचे आजूबाजूला क्वचितच लक्ष असते. मात्र एका बाईक रायडरने भर गर्दीत आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावरील एका मांजरीच्या पिलाचे प्राण वाचविले. ही घटना हाँगकाँग येथील रॉक टनेल रोडवर घडली असून, या अनोख्या धाडसामुळे हा केव्हीन बाईक रायडर खरा हिरो ठरला आहे. या रस्त्याने अनेक वाहने जात होती, अचानक लहानसे मांजरीचे पिलू रस्त्याच्या मध्ये आले. हे लहानसे पिलू बराच वेळ रस्त्यात घुटमळत असताना अनेक वाहने तिथून जात होती. मात्र या पिलाचा जीव वाचावा यासाठी केव्हीनने पुढाकार घेत प्रत्यक्ष कृती केली. केव्हीनने आपली बाईक बाजूला घेत रस्त्याच्या मधे जाऊन वेगाने येणाऱ्या वाहनांना थांबविले आणि या पिलाला उचलून घेत तो पुन्हा आपल्या बाईकजवळ आला. बाजूने वेगाने वाहने येत असतानाही केव्हीनने न घाबरता हे धाडस करुन प्राण्यांप्रती असणारे आपले प्रेम दाखवून दिले.

इतकेच करुन तो थांबला नाही तर या मांजराच्या पिलाचे फोटो आणि व्हिडिओ त्याने फेसबुकवर व्हायरल केले. या पिलाला कोणी दत्तक घेण्यासाठी रायडरने आवाहन केले होते. त्यानुसार काही वेळातच या पिलाला मालक मिळाला असून केव्हीनने पिलाचा ताबा मालकाकडे दिल्याचेही फोटो व्हायरल झाले आहेत. हा व्हिडिओ अतिशय कमी वेळात सोशल मिडियावर अनेकांकडून पाहिला गेला.

बाईक राईडरच्या रुपाने मांजरीच्या पिलाचा जीव वाचला असल्याने माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. तर सोशल मीडियाचा सकारात्मक गोष्टींसाठी होणारा वापराने या माध्यमांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्यास मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 5:00 pm

Web Title: and he save life of kitten
Next Stories
1 विराट म्हणतोय, कोणी इतकं गोंडस कसं असू शकतं?
2 ‘स्वच्छ भारत अभियान’ फारच गंभीरतेने घेतलंय, मग काय प्रियांकावर चर्चा तर होणारच!
3 बिल गेट्स यांची रिक्षाने भारत भ्रमंती!
Just Now!
X