News Flash

आणि जापनीज जो बायडेन रातोरात झाले इंटरनेट स्टार

...तोपर्यंत बायडेन यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. यानंतर अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन पुढे आले आहेत. एकीकडे ही घटना घडल्यानंतर दुसरीकडे जपानमधील एका ७३ वर्षीय राजकारण्यास रोतोरात प्रसिद्धी मिळाली आहे.

१५ हजार लोकवस्तीचे जपानमधील छोटे शहर यामातो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामगाचं मुख्य कारण शहराचे महापौर युताका उमेदा आहेत. कांजी लिपीमध्ये लिहिलं असता त्यांचं नाव अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नावाशी साधर्म्य पद्धतीने वाचलं जात असल्याकडे अनेकांनी लक्ष वेधलं.

जपानी कांजी वर्णांमध्ये सामान्यत: मल्टिपल फोनेटिक्स रिडींग्स असते. ‘मनुका’ आणि ‘भात शेती’ करणाऱ्या कुटुंब प्रमुखांच्या नावांचा उच्चार सहसा ‘उम’ आणि ‘दा’ म्हणून केला जातो. पण, हे शब्द ‘बाय’ आणि ‘डेन’ म्हणूनही वाचता येतात. तर, युताकाचे उच्चारही ‘जो’ म्हणून सामान्यपणे केला जाते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत जो बायडेन यांच्या विजयाबद्दल बोलताना उमेदा म्हणतात की, ”मी त्यांच्या अगदी जवळ असल्यासारखं मला वाटत आहे. जेव्हा जो बायडेन यांचा विजय झाला तेव्हा मीच निवडणूक जिंकल्यासारखं मला वाटत होतं.” तसेच, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं आणि यामातोचा महापौर असणं दोन्ही पूर्णपणे वेगळं आहे. मात्र, शहराला त्या मार्गाने पुढे नेण्याचा विचार करायला मला आवडेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.

उमेदा म्हणतात, जो बायडेन यांचा विजय झाल्यानंतर त्यांना आलेल्या अनेक मेसेजमुळे मोठा गोंधळ झाला. त्यांनी जपान टाईम्सशी बोलाताना सांगितले की, बायडेन यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. जो पर्यंत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना याबाबत सांगितले नव्हते. तसेच, जर, मला कधी बायडेन यांना भेटण्याची संधी मिळाली, तर आपण त्यांना “कुमामोटोचे बायडेन” अशी स्वतःची ओळख करून देईल असं ते म्हणाले.

हे पहिल्यांदाच घडत आहे की, नावातील साधर्म्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची लिंक ही जपानशी लागत आहे. फुकुई प्रांतात असलेले ओबामा नावाचे बंदराचे शहर २००८ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा निवडून आल्यानंतर प्रसिद्ध झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 4:19 pm

Web Title: and the japanese joe biden became an internet star overnight msr 87
Next Stories
1 बापाचं चित्रपटनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावंडं चोरायचे बकऱ्या; असा झाला भांडाफोड
2 धक्कादायक… दूध कारखान्यात कर्मचारी दुधानेच अंघोळ करायचा अन्…
3 IPL 2020 : स्टॉयनिस शून्यावर बाद पण सोशल मीडियावर गंभीर होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण…
Just Now!
X