X

आता विश्वास ठेवायचा कोणावर? वेश बदलून फावल्या वेळेत पोलीस अधिकारी करायचा चोरी!

८० च्या दशकातील चोरीची चर्चा

ब्राझिलमधील दरोडेखोरांचा कट उधळला गेल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली. या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकण्यासाठी चक्क आठ कोटींहून अधिक रुपये खर्च करून भुयार खणलं होतं. वेळीच पोलिसांना त्यांच्या कटाचा सुगावा लागला आणि ब्राझिलच्या इतिहासातला सर्वात मोठा बँक दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. याची जगभर चर्चा होत असताना ८० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेतल्या एका कुख्यात चोरट्याची गोष्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरली. अँड्रे सँडर असं त्याचं नाव असून, तो चोर आणि पोलीस अशी दुहेरी भूमिकेत असायचा.

अँड्रेने पोलीस दलात जावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र कायद्याचे रक्षण करण्यात अँड्रेला काडीमात्रही रस नव्हता. पण वडिलांच्या आदेशापुढे त्याला काहीच करता येईना. शिक्षण घेऊन नाईलाजाने तो पोलीस दलात रुजू झाला. मुलाने आपली इच्छा पूर्ण केली म्हणून वडिलही खूश होते. अँड्रेला पोलीस दलात मान आणि चांगलं पदही होतं. सारं काही सुरळीत सुरू होतं, पण अँड्रेचं मन काही केल्या नोकरीत रुळत नव्हतं. याकाळात त्याने आपल्या पत्नीलाही घटस्फोट दिला आणि पोलिसाची नोकरी करण्यापेक्षा त्याने चोरीचा मार्ग पत्करला.

वाचा : ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती; कुटुंबाला कंपनीकडून स्पेशल गिफ्ट

आपल्या सहकाऱ्यांच्या लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने तो बँकांवर दरोडा टाकायचा. पोलीस अधिकारी असल्याने कोणीही अँड्रेवर संशय घेतला नाही. पुढे तपासात मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या फावल्या वेळात त्याने अनेक बँका लुटल्याचंही समोर आलं. एकदा त्याने डर्बनमधली बँक लुटली होती. खोटी दाढी आणि विग लावून तो बँकेत शिरला. बँकेतील महिला कर्मचाऱ्यासमोर बंदुक धरली आणि तिला बॅगेत पैसे ठेवायला सांगितले. घाबरून कर्मचाऱ्याने बॅगेत पैसे भरले. कोणताही आरडाओरडा न करता किंवा कोणालाही न धमकावता अँड्रेने सहज चोरी केली आणि पुन्हा कामावर रुजू झाला. अनेकदा चोरी करून झाल्यानंतर अँड्रे स्वत: तिथे जाऊन चौकशी करायचा.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेकून अँड्रेने एक दोन नाही तर चक्क पंधराहून अधिक चोऱ्या केल्या. शेवटी एक दिवस अँड्रेला पकडण्यात पोलिसांना यश आलं. अँड्रेला नंतर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ८० च्या दशकात अँड्रेच्या या चोरीची चर्चा जगभर गाजली. अँड्रेला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अँड्रेची रवानगी तुरूंगात झाली. तिथे दोन कैद्याच्या मदतीने तीन वर्षांच्या आतच त्याने पलायन केलं. अमेरिकत पळून गेल्यानंतर त्याने आरामात काही वर्षे घालावली. पुढे एका चकमकीत पोलिसांकडून तो मारला गेला.

वाचा : गावकऱ्यांनी चक्क भलामोठा अजगर तळून खाल्ला!

Outbrain