News Flash

Viral Video: बकरीसोबत ‘सेल्फी’ घेण्यात मग्न झाली होती तरुणी, पण अचानक…

कुठेही जाऊन सेल्फी घेणं आजकाल सामान्य बाब झालीये...

कोणत्याही ठिकाणी किंवा व्यक्तीसोबत सेल्फी घेणं आजकाल सामान्य बाब झालीये. लोकांना सेल्फी घेण्याची इतकी सवय लागलीये की हातातली एकही चांगली संधी कोणी सोडत नाही. मग कोणी वृ्दध असो की एखादी महिला किंवा लहान मुलगा, सर्वांनाच सध्या सेल्फीचं ‘याड’ लागलंय. पण, सेल्फीच्या नादात अपघात घडल्याचंही अनेकदा समोर आलंय. कित्येकदा सेल्फी जीवघेणा ठरल्याच्या बातम्या आपण वाचल्यात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा एक सेल्फी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल हे नक्की, पण त्यासोबतच सेल्फी घेताना सर्व खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही लक्षात येईल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुणी बकरीसोबत सेल्फी व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. पहिल्यांदा बकरी शांत उभी राहते, पण थोड्याच वेळात बकरीला राग येतो आणि तरुणीला टक्कर मारण्यासाठी ती थोडी मागे जाते. दोन वेळेस तरुणीला टक्कर देण्याचा बकरी प्रयत्न करते, पण तिला टक्कर मारता येत नाही. अखेर तिसऱ्यांदा मात्र सेल्फी व्हिडिओ बनवण्यात मग्न असलेल्या तरुणीला बकरी अत्यंत जोरदार टक्कर देते. तरुणी सेल्फी व्हिडिओत इतकी मग्न असते की बकरीपासून आपल्याला धोका असू शकतो याचा ती विचारही करत नाही. इन्स्टाग्रामवर ‘द वाइल्ड कॅप्चर’ नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wildlife Capture (@thewildcapture)


ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही, पण इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यापासून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:34 pm

Web Title: angry goat attacks woman during selfie watch viral video sas 89
Next Stories
1 ‘थर्ड अंपायरपेक्षा निवडणूक आयोग अधिक वेगाने निकाल देतं’; नेटकऱ्यांनी काढली पंचांचीच विकेट, पाहा Viral Memes
2 नेटकऱ्याने पोस्ट केला मुंबईत ‘लिट्टी-चोखा’ विकणाऱ्याचा संघर्षमय प्रवास, Zomato ने दिली ‘गुड न्यूज’
3 अजब! ट्रक चालकावर चक्क हेल्मेट न घातल्यामुळे कारवाई, परिवहन विभागाचा भोंगळ कारभार
Just Now!
X