News Flash

अन् गावक-यांनी चक्क मुख्य वन संरक्षकाच्या घरातच मगर सोडली

वारंवार फोन करूनही प्रतिसाद न दिल्याने शिकवला धडा

मध्यप्रदेशमधल्या माली गावातील वस्तीत मगर शिरली होती. ( छाया सौजन्य : दैनिक भास्कर )

वारंवार फोन करूनही वस्तीत शिरलेल्या मगरीला बाहेर काढण्यासाठी वनाधिकारी आले नाही या रागाने गावक-यांनी चक्क मुख्य वन संरक्षकाच्या निवासस्थानी मगर सोडल्याचा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला.

मध्यप्रदेशमधल्या माली गावातील वस्तीत अचानक मगर शिरली. कदाचित खाद्याच्या शोधात ही मगर तिथे आली असावी. या मगरीला पाहून गावक-यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. तिने कोणावरही हल्ला करू नये यासाठी गावक-यांनी वनाविभागाला फोन लावले. पण वारंवार फोन करून देखील वनविभागाने त्यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, रागाने गावक-यांनी या मगरीला स्वत: पकडले. पकडलेल्या मगरीला त्यांनी मुख्य वन संरक्षकांच्या घरात सोडले. ‘दैनिक भास्कर’ने हा प्रकार उजेडात आणला आहे.

Viral Video : सिंहिणीला छेडणे बेतले तरुणाच्या जीवावर

प्रसंगाचे गांभिर्य लक्षात न घेता निष्काळजीपण दाखवल्याने धडा शिकवण्यासाठी गावक-यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गावक-यांनी या मगरीवर जाळी टाकून तिला पकडले आणि पकडलेली मगर धाडसाने त्यांनी मुख्य वन संरक्षकाच्या घरात नेऊन सोडली. अर्थात घरात मगरीला पाहून वन संरक्षकांची घाबरगुंडी उडली. वन संरक्षकांच्या घरात मगर घुसल्याचे कळताच वनविभागाचे अधिकारी धावत त्यांच्या घरी आले. या मगरीला घरातून बाहेर काढून त्यांनी सुखरुप नदीत सोडले. दरम्यान बेजबाबादार वनविभागाला धडा शिकवलेल्या या गावक-यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 6:26 pm

Web Title: angry mp villagers dropped a crocodile at forest officer house
Next Stories
1 ७५% भारतीय चालकांना जीपीएस कसे वापरायचे हेच माहित नाही
2 दातांच्या आकारावरून ओळखा स्वभाव
3 जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे
Just Now!
X