25 September 2020

News Flash

अनुष्काच्या साक्षीने! शाळेतल्या आठवणींना उजाळा.. फोटो व्हायरल

दोघींचे शिक्षण आसाममधील छोट्या गावात झालेय

भारताच्या आजी-माजी कर्णधारांच्या पत्नीमध्ये एका खास नाते आहे. या दोघींनी एकाच शाळेत शिक्षण घेतले असल्याने या दोघीही वर्गमैत्रीणी आहेत. होय! अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांनी एकाच शाळेत शिक्षण झाले आहे. दोघींचे शाळेतील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

व्हायरल होणाऱ्या यातील एका फोटोत एखाद्या कार्यक्रमासाठी साक्षी आणि अनुष्काने पोषाख परिधान केल्याचे दिसून येत आहे. यात अनुष्काने गुलाबी घागरा-चोली आणि साक्षीने राजकुमारीसारखा पोषाख परिधान केला आहे. नेटीझन्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.


अनुष्का आणि साक्षी यांचे शालेय शिक्षण आसाममधील मार्घेरिता येथील सेंट मेरी स्कूलमध्ये झाले आहे. २०१३ जेव्हा दोघींची पुन्हा भेट झाल्यानंतर गप्पादरम्यान त्यांना आपण एकाच शाळेत शिकलो असल्याचे समजले. घरांमध्ये माझ्या लहानपणीचा एक फोटो मिळाला. त्यामध्ये साक्षी राजकुमारीसारखा पोशाखात उभी होती. तर मी माधूरीप्रमाणे घागरा घातला होता.

एका इंग्रजी वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने याचा खुलासा केला आहे. साक्षी आणि माझं शालेय शिक्षण आसाममधील एका छोट्या गावात झाले आहे. आमच्यामध्ये शाळेतील गप्पा सुरू असताना साक्षीने आपलं शिक्षण आसाममध्ये झाल्याचे सांगितले. त्यानंतर मी तिला आणखी खोदून विचारले तेव्हा तिने सेंट मेरी स्कूलबद्दल सांगितले. त्यावेळी मी म्हणाले, मी पण याच शाळेत गेले आहे. अशा पद्धतीने आम्ही दोघी वर्गमैत्रीणी पुन्हा एकदा भेटलो. जे जग खरच खूप छोटं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 12:47 pm

Web Title: anushka sharma and sakshi dhoni were schoolmates and their pictures are breaking the internet see here
Next Stories
1 Budget 2019: जयंत सिन्हा बोलत असताना वाकुल्या काढून दाखवणारी मुलगी सोशल मीडियावर हिट
2 ना घोडा…ना गाडी…रोड रोलर घेऊन लग्नमंडपात पोहोचला नवरदेव
3 ‘कल हो ना हो’मधील सैफ अली खान असल्याचे सांगून टिंडरवरुन अमेरिकन महिलेला फसवले
Just Now!
X