News Flash

Photos : अनुष्काच्या बिकिनीतल्या ‘हॉट’ फोटोवर ‘कूल’ मीम्स व्हायरल

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. 

विराट कोहली, अनुष्का शर्मा

आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत नेटकरी कधी कोणत्या फोटोचं रुपांतर भन्नाट मीममध्ये करतील याचा नेम नाही. अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच बिकीनीतला फोटो पोस्ट केला. या फोटोने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे अनुष्काचा पती क्रिकेटर विराट शर्मानेही या फोटोवर कमेंट केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. पण आता या फोटोवर गमतीशीर मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

या फोटोमध्ये अनुष्का समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसून पोझ देताना पाहायला मिळत आहे. तिच्या बिकीनीची तुलना नेटकऱ्यांनी चक्क अजगराची कातडी आणि रस्त्यांवर असलेल्या ट्रॅफिक कोनशी केली आहे. काही मीम्समध्ये तर क्रिकेटच्या मैदानावर बसलेला विराट आणि त्याच्यासमोर बसलेली अनुष्का दाखवण्यात आली आहे. अनुष्काच्या ‘सुई धागा’ या चित्रपटातील एक मीम खूप व्हायरल झाला होता. तोच फोटो वापरत नव्याने मीम्स तयार करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांची ही कल्पकता पाहून अनुष्काही पोट धरून हसेल.

अनुष्का सध्या भारताच्या संघाबरोबर विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ती विराटसोबत वेळ घालवत आहे आणि विंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत आहे. याच ठिकाणच्या या फोटोमुळे सध्या विरूष्का जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. अनुष्काच्या ‘हॉट’ फोटोवर सर्व चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. पण या सर्व कमेंटमध्ये विराटची कमेंट सर्वात खास ठरली. विराटने तिच्या फोटोवर शब्दांनी व्यक्त न होता इमोजी टाकून आपले प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 6:20 pm

Web Title: anushka sharma bikini photoshoot is a viral meme now ssv 92
Next Stories
1 VIDEO: एस्केलेटरवरील मस्ती पडली महागात, पाहा नक्की काय झाले
2 जाणून घ्या, सोशल मीडियावर का ट्रेण्ड होतेय गुलाबजामची भाजी
3 ‘Employee Of The Month’ पुरस्कार मिळाल्यानंतर बहिणीने केली पोलखोल, नेटकरी म्हणाले…
Just Now!
X