तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने शतक लगावत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. ९२ व्या षटकात कोहलीने चौकार लगावत कारकिर्दीतले 23वे शतक साजरे केले. कोहलीचे या दौऱ्यातील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. शतकानंतर स्टेडियममध्ये उभा असलेल्या अनुष्का शर्माने टाळ्या वाजवत विराटच्या खेळीला दाद दिली. विराट कोहलीनेही आपले प्रेम पुन्हा एकदा व्यक्त करत अनुष्काला फ्लाईंग किस दिला. सोमवारी अनुष्का सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. विराट कोहलीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत संघाला सुस्थितीत नेहून ठेवले. विराट कोहलीने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी केली. विराट कोहलीने १९७ चेंडूमध्ये १०३ धावांची खेळी केली.

 

पहिल्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने गळ्यातील रिंगचे चुंबन घेत अनुष्काप्रती आपले प्रेम जाहिर केले होते. अनुष्काही आपले स्टेडियममध्ये हजर राहत विराटप्रती आपले प्रेम व्यक्त करत असते.

 

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा आज चाैथा दिवस असून इंग्लंडपुढे विजयासाठी भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. तर भारताला दोन दिवसाच्या खेळात १० गडी बाद करून मालिकेतील पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दरम्यान, काल तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या. त्याआधी भारताने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.