अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ या दोन नव्या हँडसेटचे अनावरण केला. अॅपलचे हे फोन खास तर होतेच पण यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अॅपलच्या एअरपॉडची. वायरलेस असे हे इअरफोन होते. हे एअरपॉड १०० हून अधिक देशांत उपलब्ध आहेत. या एअरपॉडची किंमत इतकी अधिक आहे की त्यात एक स्मार्टफोन नक्की विकत येईल.

वाचा : बांगलादेशी तरुणींच्या मनावर राज्य करतो ‘हा’ तरूण

आयफोनने नुकतीच आपल्या फोन व्यतिरिक्त इतर गॅझेटच्या किंमतीचे पेज अपडेट केले आहे. यात एअरपॉडची किंमत देण्यात आली आहे. हे एअरपॉड जर हरवले किंवा तुटले तर मात्र ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या एअरपॉडच्या पूर्ण सेटसाठी ग्राहकाला १६० डॉलर म्हणजे जवळपास साडेदहा हजार रुपये मोजावे लागणार आहे. हा आकडा बघुन अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. तर दुसरीकडे जर या एअरपॉडच्या जोडीमधला एका इअरफोन हरवला तर ग्राहकाला संपूर्ण जोडी विकत घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याबदल्यात तो एक इअरफोन विकत घेऊ शकतो असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या एका इअरफोनसाठी ग्राहकाला साडेचार हजार म्हणजेच ६९ डॉलर मोजावे लागणार आहे.

वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीसोबत कॉफी डेटला जाण्यासाठी ३३ लाखांची बोली

सप्टेंबर महिन्यात आयफोन ७ चे अनावर करण्यात आले. भारतात हा फोन ऑक्टोबर महिन्यापासून उपलब्ध झाला. भारतात ‘आयफोन ७’ ३२ जीबीची किंमत ही ६२,००० तर १२८ जीबी फोनची किंमत ७२ हजार इतकी आहे.