25 November 2020

News Flash

तब्बल ४० दिवसांनंतर ‘त्या’ शहरात झाला सूर्योदय

कित्येक दिवस तिथे उजाडलंच नव्हतं

मूरमान्स्कमध्ये ४० दिवसांनी सूर्योदय झाला असून तिथल्या लोकांनी सोशल मीडियावर या सूर्योदयाचे फोटो अपलोड केले आहेत.

काही दिवसांपूर्वी आपण रशियातल्या ओयमियाकन गावाबद्दल वाचलं होतं. हिवाळ्यात येथे हाडं गोठवणारी थंडी असते. या गावात हिवाळ्यातलं तापमान हे उणे ५० ते ७० अंश सेल्शियसच्या आसपास असते. रशियातलं आणखी एक असं ठिकाण आहे जिथे कडाक्याची थंडी तर असतेच शिवाय येथे कित्येक दिवस सूर्योदयचं होत नाही.

तापमान -७० अंश सेल्सिअस., रशियातल्या ‘या’ गावात असते हाडं गोठवणारी थंडी

सहारा वाळवंटात चक्क बर्फवृष्टी!

मूरमान्स्क हे असं ठिकाण जिथे तब्बल ४० दिवसांनंतर सूर्योदय झाला आहे. नववर्ष उजाडून तब्बल १५ दिवस लोटल्यानंतर इथे सूर्योदय झाला आहे त्यामुळे सूर्योदयाचा सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी अनेक लोक सनी माऊंटन इथल्या प्रसिद्ध टेकडीवर जमले. फक्त अर्ध्या तासासाठी येथे सूर्यदर्शन झाले, त्यानंतर पुन्हा अंधाराचं साम्राज्य पसरलं. अर्ध्या तासाचा सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी लोक या परिसरात जमले होते. २ डिसेंबर पासून येथे ध्रुवीय रात्र सुरू झाली होती. ११ जानेवारीला सूर्यानं अर्ध्यातासानं दर्शन दिलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 1:43 pm

Web Title: arctic russian city murmansk greets daylight first sunrise in 40 days
Next Stories
1 असा विचित्र अपघात तुम्हीही पाहिला नसेल, कार शिरली थेट दुसऱ्या मजल्यात
2 ‘लग जा गले’, सतत मिठी मारणाऱ्या पंतप्रधान मोदींची काँग्रेसकडून खिल्ली
3 आज विकीपीडियाचा वाढदिवस: विकीपीडियावर वाढते मराठी…
Just Now!
X