News Flash

दरोडा घालायला आला आणि भलतंच करुन गेला; पाहा व्हिडीओ…

सोशल मीडियावर या अनोख्या पद्धतीने घातलेल्या दरोड्याची चर्चा आहे.

दरोडेखोरांना पाहून भल्याभल्यांना धडकी भरते. चेहऱ्यावर क्रूर भाव आणि हातात बंदुक किंवा धारधार शस्त्र असलेल्या या लुटारुंनी आपली संपत्ती लुटू नये, म्हणून आपण नेहमीच जागरुक असतो. परंतु एका दरोडेखोराने मात्र, एका महिलेला त्याचं प्रेमळ रूप दाखवलं आहे.

सोशल मीडियावर या अनोख्या पद्धतीने घातलेल्या दरोड्याची चर्चा आहे. या दरोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोन दरोडेखोर दरोडा घालण्याच्या उद्देशाने दुनाकात प्रवेश करतात. त्यानंतर दुकान मालकाला बंदुकाचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. हा अचानक घडलेला प्रसंग पाहून त्यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या एका वृद्ध बाईची घाबरगुंडी उडते. त्यांनी तिला सुखरुप सोडावे यासाठी ती दरोडेखोरांसमोर गयावया करु लागते. दरम्यान त्या दोन दरोडेखोरांपैकी एक जण तिला शांत करतो. आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतो.

ब्राझीलमध्ये घडलेला हा प्रसंग तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी युट्यूबर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 4:36 pm

Web Title: armed robber kisses elderly customer inside a pharmacy mppg 94
Next Stories
1 अजब! चीनमध्ये पुलाखाली अडकलं विमान, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
2 गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बायकोला घरात कुलूप लावून केलं बंद
3 मतदानावेळी तेंडुलकरला पाहून क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरने केलं ‘हे’ कृत्य
Just Now!
X