‘ट्युबलाईट’मधल्या त्या छोट्या माटिन रे तंगू या बालकलाकाराचा किस्सा तुम्हाला आठवतो का? या बिचाऱ्या माटिनला अनेकांनी चिनी समजण्याची चूक केली होती. अर्थात यात दोष हा आपल्या मानसिकतेचा आहे. अनेकदा ईशान्येकडून एखादा भारतीय नागरिक दक्षिण किंवा उत्तरेकडील राज्यात आला की त्याला हमखास नेपाळी, चिनी वगैरे समजण्याचा मूर्खपणा अनेकजण करतात. आता ही भारतातील परिस्थिती आहे तर जगाच्या पाठीवर ईशान्येकडील एखादा नागरिक गेला आणि त्याला नेपाळी किंवा चिनी समजण्याची चूक इतरांनी केली तर नवल वाटायला नको.

असंच काहीसं झालं ते पंचवीस वर्षीय मॉडेल चम डेरँगसोबत. ती जिथे जाईल तिथे अनेकजण तिला चिनी समजण्याची चूक करतात. नुकत्याच लेबनॉनमध्ये पार पडलेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड २०१७’ स्पर्धेत चम सहभागी झाली होती. यात तिने बाजी मारत ‘मिस पॉप्युलर’चा किताब पटकावला. पण या स्पर्धेच्या दरम्यान अनेकजण तिला चिनी नागरिकच समजत होते. एवढंच कशाला परीक्षकांनी देखील तिला चिनी समजण्याची चूक केली होती. तेव्हा आपण चिनी नसून, भारतीय असल्याचं सगळ्यांना सांगण्याची आणि पटवून देण्याची वेळ तिच्यावर आली.
भारतीय लोकांचा वर्ण, शरिराची ठेवण याबद्दल लोकांचा एक ठराविक समज असतो. चमसारखे दिसणारे लोक ईशान्य भारतात राहतात हे अनेकांना माहितीही नव्हतं. तेव्हा त्या बिचारीवर भारत हा वैविध्यानं नटलेला देश आहे आणि इथे लोकांची शरिरयष्ठी तिथल्या प्रदेशानुसार कशी वेगळी आहे हे पटवून देण्याची वेळ तिच्यावर येते, असंही तिने एका मुलाखतीत सांगितले.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच