एक काळ होता, फोटो काढणे म्हणजे चैन समजली जायची. आता मोबाइल क्रांतीमुळे प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे. तर डिजिटल क्रांतीमुळे एसएलआर, डीएसलआर कॅमेरे अगदी सर्रास अनेकांच्या गळ्यात दिसू लागले आहेत. आज अगदी एसएलआर, डीएसलआर वापरणाऱ्यांपासून ते स्मार्टफोन वापरणाऱ्यांपर्यंत सर्वचजण स्वत:ला फोटोग्राफर म्हणतात. या फोटोग्राफर्ससाठी आजचा दिवस जरा जास्त खास आहे, कारण आज आहे जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे. याच जागतिक छायाचित्र दिनाच्या अगदी हटके शुभेच्छा दिल्या आहेत ‘चला हवा येऊ द्या’ फेम लेखक अरविंद जगताप यांनी. फेसबुकवर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

नक्की पाहा >> प्राण्यांचे हे मजेदार फोटो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल

जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने अरविंद यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये अगदी अगदी सेल्फी काढणाऱ्यांपासून ते आधारकार्डचा फोटो काढणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टची सुरुवात करताना ्त्यांनी, “आरशात बघून निराश व्हायला होतं. पण ज्यांनी काढलेल्या फोटोत स्वत:ला बघून बरं वाटतं त्यांना विशेष शुभेच्छा,” असं म्हणत प्रोफेशनल फोटोग्राफर्सला शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे लिहिताना अरविंद यांनी सामान्यातील असमान्य फोटोग्राफर शोधून शोधून त्यांचं कौतुक केल्याचं दिसत आहे. “भल्याभल्यांना वास्तवाचं भान देणाऱ्या आधार कार्डचे फोटो काढणाऱ्यांनाही शुभेच्छा,” या दुसऱ्या ओळीतून सर्वांना आधारकार्डवरील फोटोंची आठवण अरविंद यांनी जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने करुन दिली आहे.

फोटोगॅलरी  >> शिकार चोरण्याच्या नादात कोल्ह्यालाच घेऊन उडाला गरुड पण…

पुढच्या काही ओळींमध्ये त्यांनी स्मार्टफोनवरुन स्मार्ट फोटोग्राफी कऱणाऱ्या तरुणाईची फिरकी घेतली आहे. “शुभेच्छा स्वत:च स्वत:च्या भरमसाठ सेल्फी काढणाऱ्यांना,” म्हणत त्यांनी सेल्फी काढणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर इन्ट्राग्राम आणि सोशल नेटवर्किंगवर स्टोरीच्या आहारी जाऊन आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींऐवजी फोटोंना प्राधान्य देणाऱ्यांना हौशी फूड फोटोग्राफर्सला, “पहिला घास घ्यायच्या आधी भरल्या ताटाचा फोटो टाकल्याशिवाय पाेट न भरणाऱ्यांना” शुभेच्छा दिल्या आहेत. तर पुढच्या ओळीत अरविंद यांनी, “प्राण्यांचे फोटो माणसाएवढेच प्रेमाने काढणाऱ्यांना” असा उल्लेख करत वाईल्ड लाइफ फोटोग्राफरचीही आठवण काढली आहे.

नक्की पाहा >> या ट्रिक व टिप्स वापरा आणि बना मोबाईल फोटोग्राफर 

पोस्टच्या शेवटच्या ओळीमध्ये सर्वसामान्यपणे आपल्यापैकी अनेकांना येणारा अनुभव त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. “फोटो वेळेवर देणाऱ्यांना पण आणि हो… फोटोचे पैसे वेळेवर देणाऱ्यांना पण शुभेच्छा,” असं म्हणत फोटो काढून घेणाऱ्यांना आणि काढणाऱ्यांना या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

नक्की वाचा  >> फोटोग्राफी एक करिअर

अरविंद यांच्या या पोस्टवरील कमेंटमध्ये अनेकांनी त्यांना आवडलेल्या ओळी शेअर करत अरविंद यांनी मोजक्या शब्दात सर्वांच्याच मनातील भावना बोलून दाखवल्याचे  मत व्यक्त केलं आहे.