पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. सध्या सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. असं असलं तरी भाजपानेही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दमदार कामगिरी केल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने मारलेल्या या मुसंडीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना ट्रोल केलं जात आहे. प्रशांत यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी केलेल्या एका दाव्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात आहे.

काय आहे हे ट्विट?

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसंदर्भात डिसेंबरमध्येच वातावरण रंगू लागल्यानंतर प्रशांत यांनी ट्विट करुन भाजपाला निवडणुकीच्या निकालांमध्ये दोन आकडी संख्या गाठण्यासाठीही धडपडावं लागेल असं म्हटलं होतं. इतकच नाही भाजपाने मोठं यश मिळवल्यास मी ट्विटर सोडून देईल असंही ते म्हणाले होते.  “माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा आणि जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन,” अशी घोषणा किशोर यांनी केली ट्विटरवरुन केली होती. किशोर यांनी हे ट्विट पीन टू टॉप म्हणजेच त्यांच्या प्रोफाइलवर वर दिसेल असं ठेवलं आहे.

या ट्विटवरुनच आता भाजपाने ९३ जागांवर आघाडी मिळवल्यानंतर किशोर यांना भाजपासमर्थकांकडून ट्रोल केलं जात आहे. तर काहींनी त्यांच्या ट्विटवरुन भाजपा तीन आकडी संख्या गाठणार ही भविष्यवाणी खरी ठरल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरु झाल्या आहेत.ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर मोठा तंबू उभारण्यात आला असून मोठे स्क्रीनही लावण्यात आले आहेत.