01 March 2021

News Flash

फेकन्युज : धर्मगुरूवरील हल्ला भाजप कार्यकर्त्यांकडून नव्हे

वस्तुस्थिती अशी आहे की, चर्चमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका धर्मगुरूला चर्चमधीलच सदस्यांनी मारहाण केली होती.

‘बंगलोरमधील चर्चमधील एका धर्मगुरूवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली आहे; परंतु या ध्वनिचित्रफितीशी जोडलेला मजकूर बनावट आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, चर्चमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका धर्मगुरूला चर्चमधीलच सदस्यांनी मारहाण केली होती. मुळात हा प्रकार तेलंगणामधील एका चर्चमध्ये २७ मे २०१८ रोजी घडला होता. चर्चमधील काही अंतर्गत कारणावरून धर्मगुरू राव यांच्याशी वादावादी झाली होती. चर्च समितीवरील शांताकुमार कोलापुडी याने राव यांच्यावर हल्ला केला. धर्मगुरूला चर्चमधून काढून टाकण्यात आले असतानाही राव हे प्रार्थनेस व्यासपीठावर उपस्थित होते. याविषयी कोलापुडी याने धर्मगुरूकडे विचारणा केली असता त्यावर राव यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने कोलापुडी याने राव यांच्यावर माइक फेकून मारले. यात ते जखमी झाले. यातील सत्यस्थिती बदलून काहींनी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:33 am

Web Title: attack on the religious leader fake news
Next Stories
1 फेकन्युज : ओबामांच्या तोंडी
2 सुरक्षित चिंब भटकंती
3 खाद्यवारसा : उपवासाची दाण्याची आमटी
Just Now!
X