एअरपोर्टवर चेक इन केल्यानंतर सामानाचीही तपासणी होते. नंतर प्रवाशांचं सामान विमानात लोड केलं जातं. प्रवाशी आपल्या इच्छित स्थळी पोहोचले की चेक आऊट करताना त्यांना सामान मिळतं. जरी वाचायला ही प्रकिया खूप सोपी असली तरीही अनेकांना या प्रकियेतून जाताना खूप वाईट अनुभव येतात. कधी कधी सामान हरवतं. बरं हे हरवलेलं सामान कधी कधी मिळतंही नाही. अनेकदा आतल्या सामानाची मोडतोडही होते. असे कितीतरी बरे वाईट अनुभव विमानाने प्रवास करताना आले असतील. पण ऑस्ट्रेलियातल्या प्रवाशाला मात्र याहून वेगळा अनुभव आला.

वाचा : लाखो तरुणींना घायाळ करणाऱ्या पाकिस्तानी चहावाल्याचं सत्य उघड!

फक्त बिअरचा एक कॅन घेऊन तो एअरपोर्टवर पोहोचला. गंमत म्हणून त्याने आपला बिअर कॅन सामानाच्या भागात जाऊ दिला. जिथे माणसांचं सामान हरवतं ते तक्रारी करूनही मिळत नाही तिथे बिअरचा कॅन कुठून मिळणार असं त्याला वाटलं. पण चार तासांचा प्रवास करून जेव्हा तो मेलबर्न एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्यचा धक्का बसला कारण त्याचा बिअर कॅन अत्यंत चांगल्या स्थितीत त्याच्यापर्यंत पोहोचला होता.

वाचा : म्हणून ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले