अमेरिकेतील लुईझियाना शहरात राहणाऱ्या मॅकडोनल्डच्या माजी कर्मचाऱ्यानं आईस्क्रीम मशिनचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर मॅकडोनल्ड कंपनी चांगलीच अडचणीत आली होती. या आईस्क्रीम मशीन्सचे किसळवाणे फोटो आणि तिथली अस्वच्छता पाहून इथले पदार्थ कोणी पुन्हा तोंडातही टाकाणार नाही हे नक्की! या घटनेला पंधरा दिवसही उलटले नाहीत आणि तोच आणखी एक घटना समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये राहाणाऱ्या एमी मॅकहग या महिलेनं मॅकडॉनल्डाच्या बर्गरचा फोटो अपलोड केलाय. हे फोटो पाहून बर्गर ऑर्डर करण्यापूर्वी प्रत्येकजण शंभरवेळा विचार करेल हे नक्की! एमीने आपल्या मुलासाठी मॅकडोनल्डमधून हॅप्पी मिल मागवलं होतं. यात बर्गरही होता. तिच्या मुलानं बर्गर थोडा खाल्ला. जेव्हा तिचं आपल्या मुलाच्या हातातल्या बर्गरकडे लक्ष गेलं तेव्हा तिला धक्का बसला कारण यात शेकडो अळ्या होत्या. बर्गरमध्ये असणाऱ्या मटन पॅटीमध्येही शेकडो अळ्या होत्या.

एमीने याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड केलेत. या बर्गर खाऊन जर आपल्या मुलाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? असा प्रश्नही तिनं उपस्थित केलाय. हे प्रकरणावर आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढू असंही ती म्हणाली.